नागपूर : ‘ऑक्टोबर हीट’च्या चटक्यांमध्ये वाढ झाली असून बुधवारी अकोला जिल्ह्यात सर्वाधिक ३७.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी १७.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यातील कमाल तापमान आतापर्यंत ३० अंशाच्या खाली गेले होते. ते आता ३५ अंशांच्या पुढे गेले आहे. अकोला जिल्ह्यात सर्वाधिक ३७.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तापमानात झपाट्याने वाढ होत असून असह्य उकाडा आणि उन्हाच्या चटक्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, किमान तापमानात राज्यात गेल्या आठ दिवसांपासून किंचित घट झाली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत वातावरणात मोठा बदल झाला आहे. दिवसा कडक ऊन, तर रात्री आणि पहाटे थंडी जाणवत आहे.
हेही वाचा – अमरावती: कंत्राटीकरणाचा विरोध! स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा
कमाल तापमानात होणारी वाढ आणि उकाडा बुधवारी अधिकच जाणवत होता. दरम्यान, कोकण आणि गोवा वगळता उर्वरित राज्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. तर परतीचा पाऊस जाऊनही कोकण-गोव्यातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.