चंद्रपूर : ओडीसा राज्यातून छत्तीसगड होत महाराष्ट्रात दाखल झालेल्या नर हत्तीचा मुक्काम सध्या सिंदेवाही तालुक्यात आहे. अनेकांच्या शेतातील पिकांचे नुकसान हत्तीने केले असून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

ओडीसा राज्यातून आलेला नर हत्ती गडचीरोलीच्या जंगल मार्ग वैनगंगा नदी ओलांडून चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीनंतर सावली, नागभीड तालुक्यातील गंगासागर हेटी परीसरातून सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार जंगलात दाखल होऊन त्याने शेतशिवारात थैमान घातले आहे. यात कच्चेपार येथील जंगलालगतच्या शेतीमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हत्तीच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या सुमारास जंगललगत असलेल्या २० शेतकऱ्यांच्या शेतीतील धान पिकांचे नुकसान केले असल्याची घटना १२ सप्टेंबरला सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या हत्तीने कच्चेपार येथील देविदास आत्राम यांच्या शेतातील एक विद्युत खांबसुद्धा पाडला होता. शेतातून हत्ती पिके तुडवित असल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यानंतर हत्तीने आपला मोर्चा मरेगाव, धानोरा मार्गे लोनखैरी या गावाकडे वळविला. १३, १४ व १५ सप्टेबर रोजी हा हत्ती चिकमारा, गुंजेवाही, खैरी, पवना, पवनपार गावकडे नागरिकांना आढळून आला असून या परिसरातील अनेक शेतांतील पिकांचे नुकसान केले आहे.

odisha cyclone
ओडिशात १.७५ लाख एकर पिकांचे नुकसान, दाना चक्रीवादळाचा परिणाम
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
dr madhukar bachulkar new mahabaleshwar
नवीन महाबळेश्वर प्रकल्पामुळे पर्यावरणाची मोठी हानी, डॉ. मधुकर बाचूळकर यांचे टीकास्त्र
Three laborers died after a water tank collapsed in Pimpri Chinchwad
Pune Water Tank Collapse : पिंपरी- चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळून पाच कामगारांचा मृत्यू; ७ गंभीर जखमी
Muddy and smelly water
मुंबई: पूर्व उपनगरात गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी; भातसा पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी, महापालिकेचा दावा
Shalimar express
नागपूर: शालिमार एक्स्प्रेस रुळावरून घसरली, प्रवासी जखमी
crops damage in Maharashtra
राज्याच्या अनेक भागांना पावसाचा फटका; पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती
Kolhapur rain paddy crops
Kolhapur Rain News: कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे पिकांना फटका

हेही वाचा – नक्षल चळवळीला हादरा, जहाल नक्षलवादी संजय राव आणि त्याच्या पत्नीला अटक, विविध राज्यांत होते २ कोटींचे बक्षीस

वनविभागाने हत्तीद्वारा केलेल्या आजपर्यंत शेतीची नुकसानभरपाई देण्यात यावी व वनविभागाने हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. सध्या हा हत्ती आपला प्रवास रात्रीच्या सुमारास करीत असल्याने या हत्तीमुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही, परंतु अनेकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा – बुकी सोंटूच्या बँक खात्यातून १०० कोटींचा व्यवहार

हत्तीच्या नियंत्रणासाठी वनविभागाची यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी हत्तीच्या दहशतीत राहण्याची गरज नाही. नागरिकांनी वनविभागाला सहकार्य करावे, केवळ हत्तीला बघण्याची गर्दी करत असताना सावधगिरी बाळगावी. शेतकऱ्यांनी शेतीचे नुकसान झाले असल्यास वनकर्मचाऱ्यांकडे रितसर अर्ज करावे. पंचनामे तत्काळ भरून नुकसान भरपाई देण्यात येईल. – विशाल सालकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, सिंदेवाही (प्रादेशिक)