नागपूर : सध्या प्रत्येकाच्याच हाती स्मार्टफोन आला आहे. यातून सोशल मीडियाचाही वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. यातून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, व्हिडीओ शेअर करणे, व्हायरल करण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र अशा पोस्ट केल्याने आयुष्यभरासाठी नोकरीतून हात धुण्याची वेळ येऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शासकीय, खासगी नोकरीसाठी चारित्र्य प्रमाणपत्राची गरज असते. यासाठी गुन्हा दाखल नसला तरच नोकरी मिळण्याची संधी आहे. सोशल मीडियाचा वापर तरुणांनी मोठ्या जबाबदारीने करण्याची वेळ आली आहे. एका आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओने तरुणांना कायमचे नोकरीतून हात धुण्याची वेळ येऊ शकते. आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणे अनेकांना चांगलेच अंगलट आले आहे. दंगलीच्या काळात दगडफेक करणाऱ्यांना तर तुरुंगाची हवा खावी लागली आहे. जीवनात आलेल्या नोकरीच्या संधीवरही पाणी सोडावे लागले आहे. यासाठी सजग राहून गुन्हेगारीवृत्तीपासून तरुणांनी दूर राहण्याची गरज आहे.

हेही वाचा – वाशीम: अन्याय अत्याचाराविरोधात वंचितचा जन आक्रोश मोर्चा!

सार्वजिनक ठिकाणी गोंधळ घालणे, दंगलीत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग असेल तर थेट गुन्हे दाखल केले जातात. यातूनच भविष्यात करिअरच्या स्वप्नांचा पार चुराडा होतो. फेकण्यासाठी हातात दगड घेण्यापूर्वी अथवा एखादी लिंक, व्हिडीओ गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रकरण व्हायरल, शेअर करण्यापूर्वी तरुणांनी हा विचार करण्याची गरज आहे. गत सहा महिन्यांत अनेक तरुणांना आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणे महागात पडले आहे.

याअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो

कलम ४२७ : जाळपोळ करणे, सार्वजिनक शांतता भंग करणाऱ्यांवर ४२७ कलमान्वये गुन्हा दाखल केला जातो.

कलम १८८ : सार्वजनिक ठिकाणी तोडफोड करणे, पोलीस, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड विधान कलम १८८ नुसार कारवाई केली जाते.

कलम १४४ : बेकायदेशीरपणे जमाव एकत्र करणे, कायद्याचे उल्लंघन करणे, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम १४४ अन्वये कारवाई करण्यात येते.

हेही वाचा – अकोला : कपाशी व ज्वारीचे २० टक्के जादा बियाणे वापरावे लागणार, पाऊस लांबल्याने पेरणीला दिरंगाई झाल्याचा परिणाम

कलम १५३ : एखाद्या मुद्यावर भडक भाषण देणे, तापलेल्या प्रकरणाला आणखी तापविण्यासाठी भाषण करणाऱ्यांवर २५३ अन्वये गुन्हा दाखल होतो.

कलम ३५३ : शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ३५३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात येतो,

कलम १०९ : समाजात अपप्रेरणा, चिथावणी, भडकावणी, दंगलीला कारणीभूत ठरणाऱ्यांवर कलम १०९ अन्वये कारवाई करण्यात येते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Offensive posts viral videos stone pelting will result in no job opportunity for life as per this clause dag 87 ssb
Show comments