बुलढाणा: वेगळ्या विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. गारठ्यात सुरू असलेल्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून जिल्हाध्यक्षांना रक्तदाबाचा त्रास जाणवत आहे. दरम्यान या आंदोलनाकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा प्रदेशाध्यक्ष मुकेश मासुरकर, जिल्हाध्यक्ष सुरेश वानखेडे, राम बारोटे, तेजराव मुंडे, प्रकाश अवसरमोल, कैलास फाटे, जनार्दन इंगळे, रविकांत आढाव, राजेंद्र पवार हे २७ डिसेंबरपासून उपोषणाला बसले आहे. त्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आज चौथ्या दिवशी (दि. ३०) दुपारी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. समितीचे जिल्हाध्यक्ष अॅड सुरेश वानखेडे यांना रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याचे आंदोलनस्थळी सांगण्यात आले. चौथा दिवस उलटल्यावरही प्रशासनातर्फे कोणत्याही अधिकाऱ्याने आंदोलकांची भेट घेतली नसल्याचे चित्र आहे. यामुळे विविध संघटना, राजकीय पक्षांनी भेटी देत पाठींबा दिला. मात्र अपवाद वगळता साठी गाठलेल्या आंदोलकांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.
हेही वाचा – आश्चर्यच! गाय म्हणते, “जो हुकूम मेरे आका…”, मालकाने दिलेला आदेश पाळणारी ‘देवणी’
विदर्भ राज्याची निर्मिती, वीज दरवाढ मागे घ्यावी, कृषी पंपाना दिवसा वीजपुरवठा, जालना खामगाव रेल्वे मार्ग मंजूर करून राज्याने ५० टक्के निधी वाटा द्यावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, अन्नधान्यावरील जीएसटी रद्द करावा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.