नागपूर : भंडारा वनविभागाअंतर्गत नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील गोबरवाही येथे वनखात्याच्या अधिाकऱ्यांनी सापळा रचून वाघांची १५ नखे, तीन सुळे आणि दहा दात यासह सुमारे पाच किलो हाडे आणि दुचाकी वाहन जप्त करण्यात आले. यावेळी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.वाघांच्या अवयवाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती वनखात्याला मिळाली. यानंतर बनावट ग्राहक तयार करुन गेल्या दोन दिवसांपासून वनाधिकाऱ्यांनी आरोपीसोबत चर्चा सुरू ठेवली.
हेही वाचा: काळानुरूप राज्यघटनेतील तरतुदींची दुरुस्ती होणे साहजिकच: जे. साई दीपक
शनिवार, १९ नोव्हेंबरला आरोपीने विक्रीची तयारी केली. यादरम्यान नागपूर व भंडारा वनविभागााने संयुक्त पथक तयार करुन सापळा रचला. यावेळी आरोपी संजय पुस्तोडे व राम ऊईके यांना ताब्यात घेण्यात आले. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२च्या विविध कलमांन्वये वनगुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रादेशिक वनखात्याचे मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा, भंडारा उपवनसंरक्षक राहूल गवई यांच्या मार्गदर्शनात विभागीय वनाधिकारी(दक्षता) पी.जी. कोडापे, सहाय्यक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार, संदीप गिरी, साकेत शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेंढे, पी.एम. वाडे, वनरक्षक तावले, पडवळ, जाधव, शेंडे यांनी सापळा यशस्वी केला.