नागपूर: रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी करणे आणि सुरक्षित प्रवास यासाठी मेट्रो उत्तम पर्याय असल्याचा दावा करीत महामेट्रोने खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना मेट्रोशी जोडणे सुरू केले आहे.महामेट्रोच्या मल्टी मॉडेल इंटिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हिंगणा येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे महाव्यवस्थापक, मनुष्यबळ आणि प्रशासन प्रमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी  चर्चा करून मेट्रो रेल्वेच्या उपयुक्ततेकडे लक्ष वेधले. सध्या कंपनीत सुमारे ३५०० कर्मचारी कार्यरत आहेत. याइ कर्मचार्‍यांनी  खासगी वाहनांऐवजी सिटी बस आणि मेट्रो रेल्वेतून प्रवास करावा, असे आवाहन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेट्रोतून प्रवास कसा सुरक्षित आहे हे सांगण्यासाठी महामेट्रोची चमू  कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी  चर्चा करणार आहे. मेट्रोने प्रवास करण्यासाठी, मेट्रो स्थानके आणि बसस्थानकांशी संबंधित माहिती मिळवून योग्य ती पावले उचलली जातील, जेणेकरून महिंद्रा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सेवेचा सहज वापर करता येईल.महामेट्रोने कंपनीच्या आवारात महाकार्ड विक्री दालन सुरू केले. तेथून १६० कर्मचाऱ्यांनी कार्ड खरेदी केले. महिंद्रा अँड महिंद्राने २०३० पर्यंत निव्वळ खर्च कमी करण्याचे  उद्दिष्ट आहे.  कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रजापती नगर येथून लोकमान्य नगरसाठी पहिली गाडी सकाळी सहा वाजता सोडण्याचे निवेदन दिले