नागपूर : मध्य प्रदेशातील सातव्या आणि देशातील ५४ व्या व्याघ्र प्रकल्पाची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. या व्याघ्र प्रकल्पाला वीरांगना दुर्गावती यांचे नाव देण्यात येणार असून मध्य प्रदेशातील दामोह व सागर जिल्हादरम्यान २,३३९ चौरस किलोमीटर इतके त्याचे क्षेत्रफळ असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांच्या तुलनेत हा आकाराने सर्वाधिक मोठा व्याघ्र प्रकल्प असून गाभा क्षेत्र एक हजार ४१४ चौरस किलोमीटर तर बफर क्षेत्र ९२५.१२ चौरस किलोमीटर असणार आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने मध्य प्रदेशातील नौरादेही आणि वीरांगना दुर्गावती अभयारण्याचा समावेश करून या सातव्या व्याघ्र प्रकल्पाला परवानगी दिली आहे. यापूर्वी वन्यजीव मंडळ तसेच केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने मंजुरी दिली होती. मध्य प्रदेशच्या वन खात्याने या व्याघ्र प्रकल्पाच्या अधिसूचनेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला असून २९ जुलैला जागतिक व्याघ्र दिनापूर्वी याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल. गाभा व एकूण क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा राज्यातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प ठरणार आहे.

सध्याच्या स्थितीत सातपुडा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ सर्वाधिक असून त्यानंतर कान्हा व्याघ्र प्रकल्पाचा क्रमांक लागतो. केन-बेटवा नदी जोड प्रकल्पामुळे पन्ना व्याघ्र प्रकल्पाला झालेल्या नुकसानीची भरपाई या नव्या व्याघ्र प्रकल्पामुळे होईल, असा विश्वास या खात्याला आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या या संयुक्त प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी केंद्रीय पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने दोन्ही राज्यांमध्ये प्रत्येकी एक नवीन व्याघ्र प्रकल्प उभारण्याची अट ठेवली आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रत्येकी सहा व्याघ्र प्रकल्प होते, पण आता मध्य प्रदेशातील प्रकल्पांची संख्या सात होणार आहे.

मध्य प्रदेशातील व्याघ्र प्रकल्पांची स्थिती
व्याघ्र प्रकल्प – क्षेत्रफळ (चौ.किमी.)
सातपुडा – २१३३.३०
कान्हा – २०२१.७९
संजय – १६७४.५०
पन्ना – १५९८.१
बांधवगड – .१५३६.९३८
पेंच – ११७९.६३२