नागपूर : नागपूरच्या ओजस देवतळेने आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसरे सुवर्णपदक जिंकून नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने पुरुषांच्या वैयक्तिक कम्पाउंड या प्रकारात अंतिम सामना खेळत हे सुवर्णपदक जिंकले. ओजस जगातील तिरंदाजी क्रमवारीत अव्वल असलेला आंतरराष्ट्रीय तिरंदाज आहे.
हेही वाचा – भाजपा नेत्याच्या वाहनाला भरधाव एसटीची धडक; एअर बॅग उघडल्याने…
हेही वाचा – पेपरफुटीचे सत्र सुरूच; देवेंद्र फडणवीस मंत्री असलेल्या विभागाचाच पेपर फुटला…
ओजस देवतळेने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची हॅट्रीक साधल्याने नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्यामुळे नागपुरकरांनी शहरात मोठा जल्लोश साजरा केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा ओजस हा पहिलाच नागपूरकर आहे. ओजसने बुधवारी आर्चरी मिक्स टीम कम्पाउंड इव्हेंटमध्येही भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. तसेच गुरुवारी आर्चरी मेन्स कम्पाउंड टीम इव्हेंटमध्येसुद्धा भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. इतिहासात प्रथमच नागपूरच्या खेळाडूनं आशियाई खेळामध्ये सुवर्णपदक पटकाविण्याचा विक्रम केला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओजस देवतळेच्या आई-वडिलांशी संवाद साधून आनंद व्यक्त केला.