नागपूर : आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्ण पदक जिंकून नागपूर शहराचे नाव करणारा युवा खेळाडू ओजस देवतळे शहराचा २३ वर्षांचा अर्जुन पुरस्काराचा दुष्काळ मिटविणार आहे. तब्बल २३ वर्षांनंतर नागपूरच्या खेळाडूला आज मंगळवारी राष्ट्रपतीच्या हस्ते अर्जुन पुरस्कार प्रदान केला जाणार.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – महिला पोलीसच असुरक्षित! थेट विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात तक्रार

हेही वाचा – मानसिक आजारी पतीला सोडून गेली पत्नी, उच्च न्यायालय म्हणाले…

२१ वर्षीय ओजस देवतळे आपल्या कुटुंबियांसह पुरस्कार सोहळ्यासाठी दिल्लीमध्ये दाखल झाला आहे. ओजसचा जन्म होण्यापूर्वी शहरातील विजय मुनीश्वर आणि जोगिंदर सिंह बेदी यांना २००० साली अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला होता. २००० सालानंतर शहरातील कुठल्याही खेळाडूला हा पुरस्कार मिळाला नाही. २००० पूर्वी १९९६ साली नीता दवडे यांना कबड्डीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला होता. तब्बल २३ वर्षांनंतर शहराचा अर्जुन पुरस्काराचा दुष्काळ संपवल्यामुळे शहरातील क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ojas devtale will end nagpur 23 year drought of arjuna award tpd 96 ssb
Show comments