अकोला: प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेद्वारे चालविण्यात येणारी ओखा- मदुराई-ओखा विशेष रेल्वेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

सणासुदीच्या काळामध्ये रेल्वेमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली. रेल्वे गाड्यांमध्ये अद्यापही प्रवाशांची गर्दी कायम आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात गाडी क्रमांक ०९५२० ओखा – मदुराई साप्ताहिक विशेष गाडीला २५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

हेही वाचा… अवकाळी पावसाचा फटका; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांना साद

गाडी क्रमांक ०९५१९ मदुराई – ओखा साप्ताहिक विशेष गाडीला ०१ डिसेंबर ते २९ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

Story img Loader