गोंदिया : नागपूर-रायपूर महामार्गावरील देवरी येथे एका ७० वर्षीय वृद्धाला छत्तीसगडच्या भरधाव ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. यात वृद्धाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना देवरी तहसील कार्यालयासमोर आज १२ वाजताच्या सुमारास घडली. मणीराम रामजू गोटे, रा. जेटभावडा, ता. देवरी, असे मृताचे नाव आहे.
हेही वाचा – महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, येत्या २४ तासात बंगालच्या उपसागरात…
मणीराम गोटे कार्यालयीन कामाकरिता देवरी येथील तहसील कार्यालयात आले होते. दरम्यान, पैसे काढण्याकरिता बँकेत जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना त्यांना रायपूरकडून देवरीकडे येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. देवरी पोलिसांनी चालकासह वाहन ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे.