बुलढाणा : बसमध्ये बाजूला बसलेल्या वृद्ध प्रवाशाने छेड काढली. मात्र, न डगमगता तिने मध्येच खाली उतरलेल्या ‘त्याचा’ पाठलाग करत भावाच्या मदतीने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. बुलढाणा पोलिसांनी या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, या धाडसी युवतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा – रेल्वेने पुण्याला जाताय.. मग हे वाचाच!

palghar social worker Ashok Dhodi kidnapped murdered
अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या ; वाहनासह मृतदेह बंद दगड खदानीत
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
In Khadakpada area of ​​Kalyan West transgender beaten woman and her little daughter for 20000
कल्याणमधील खडकपाडा येथे तृतीय पंथीयांकडून महिलेला मारहाण
MHADA Mumbai Board plans to start redevelopment of police service residences Mumbai news
पुनर्विकासाअंतर्गत पोलिसांसाठी ४७५० घरे; म्हाडाच्या सेवानिवासस्थानांचा लवकरच विकास
rape on minor girl
प्रजासत्ताक दिनी ७० वर्षीय इसमाचा ४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक
woman alleges rape after locking in home forced for religious conversion
पुणे : धर्मांतर करण्यासाठी महिलेला डांबून ठेवून बलात्कार; विमानतळ पोलिसांकडून महिलेसह तिघांना अटक
Pune seen a rise in chain snatching cases
शहरात दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद; कोथरुड, बाणेर, कर्वेनगर भागातील घटना
19 year old girl dies after being hit by dumper accident in baner area
डंपरच्या धडकेत युवतीचा मृत्यू; बाणेर भागात अपघात, दुचाकीस्वार महिला जखमी

हेही वाचा – नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी दोषी? अहवाल सादर होऊनही कारवाई नाही

बुलढाणा येथील रहिवासी असलेली २० वर्षीय युवती चिखली येथील महाविद्यालयात शिकत आहे. ती बसने बुलढाण्याकडे परत येत होती. यावेळी तिच्या बाजूला बसलेल्या समाधान परशराम सुरगडे (वय ६३, राहणार विदर्भ हाउसिंग सोसायटी, बुलढाणा) याने तिची छेड काढली. युवतीने आपल्या भावाला फोन करून घटनेची माहिती दिली. यामुळे घाबरलेला वृद्ध बुलढाणा बस स्थानकऐवजी मध्येच चांडक ले आउट थांब्यावर उतरला. युवतीही खाली उतरली व त्याचा पाठलाग केला. याचवेळी तिचा भाऊ व इतर नातेवाईक त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी सुरगडे याला बुलढाणा शहर ठाण्यात आणले. युवतीच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Story img Loader