चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीच्या बुकींगकरीता सध्या सुरु असलेल्या http://www.mytadoba.org व https://booking.mytadoba.org हे संकेतस्थळ बुकींगकरीता तात्काळ बंद करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरून कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेकडून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीसाठी केलेली सफारी बुकींग वैध राहणार नाही.
त्यामुळे १७ ऑगस्ट २०२३ पासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी बुकींगसाठी एकमेव अधिकृत संकेतस्थळ http://www.mytadoba.mahaforest.gov.in हे असेल. यापुढे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीचे बुकींग केवळ याच संकेतस्थळावरून होणार आहे अशी माहिती ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉ जितेंद्र रामगावकर यांनी दिली.