लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाशीम : सरकारी शाळा गोर गरीब, शेतकरी, कष्टकरी मुलासाठी आशेचा किरण आहे. मात्र, सरकार सरकारी शाळा दत्तक देण्याच्या नावाखाली उद्योगपतींच्या घश्यात घालण्याचा घाट घालत असल्याचा आरोप करीत समनक जनता पार्टीच्या वतीने आज पोलीस स्टेशन चौक येथे भर पावसात रास्ता रोको आंदोलन करून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला.

सरकार एकीकडे गोर गरीबांचे कैवारी असल्याचा देखावा करीत आहे. तर दुसरीकडे गोर गरीबांचे शिक्षण उद्योगपतींच्या हवाली करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे. सरकारने दत्तक शाळा योजनेच्या नावाखाली राज्यातील जिल्हा परिषद व महानगर, नगर पालिकेच्या शाळा विकण्याचा प्रयत्न करीत असून त्या विरोधात राज्यभर आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.

आणखी वाचा-उपराजधानीतील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये अचानक वाहनांच्या रांगा..!!

आज २६ सप्टेंबर रोजी सकाळ पासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र भर पावसात समनक जनता पार्टीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, सरकारी शाळा उद्योगपतींना विकण्याचा निर्णय रद्द करा. कंत्राटी नोकर भरती प्रक्रिया थांबवा. आमदार, खासदार यांची पेन्शन रद्द करून सरकारी कर्मचारी यांना पेन्शन योजना सुरू करा. यासह विविध मागण्या करीता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी गजानन धामणे, पुंजाजी खंडारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा उडाला होता.