नागपूर: राज्यात ऐन दिवाळीत १३ नोव्हेंबरच्या दुपारी १२.५० वाजता विजेची मागणी घसरून २२ हजार ८७६ मेगावाॅट नोंदवली गेली आहे. शासकीय व बऱ्याच खासगी कार्यालयांना सुट्ट्या असल्याने ही मागणी घसरल्याचा अंदाज आहे.

राज्यात गेल्या आठवड्यात विजेची मागणी २८ हजार मेगावाॅटच्या जवळपास होती. त्यातच दिवाळीनिमित्त घरोघरी केलेल्या रोषणाईवर १०० ते १२५ मेगावाॅट वीज लागत असल्याचा अंदाज या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करतात. त्यामुळे वीज वापर वाढणे अपेक्षित होते. परंतु, राज्यातील काही भागात पडलेल्या पावसासोबत दिवाळीनिमित्त राज्यात शासकीय व बऱ्याच खासगी कार्यालयांना सुट्टी आहे. त्यामुळे वीज वापर कमी झाला. दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणावर मजूर त्यांच्या गावी सण साजरा करण्यासाठी जातात. त्यामुळे अनेक बांधकामेही काही दिवस बंद असतात. तर बरेच उद्योगाही या काळात कमी उत्पादन घेत असल्याने त्यांचाही वीज वापर कमी होतो.

suspension of recruitment in Chandrapur district bank due to Congress raise issue of recruitment in campaign
नोकरभरतीचा मुद्दा प्रचारात आणणारा काँग्रेस पक्ष तोंडघशी, चंद्रपूर जिल्हा बँकेतील नोकरभरतीला स्थगिती
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
thane district home voting
ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात
Sharad Pawar, Sudhir Kothari Hinganghat,
वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…
80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त
st mahamandal employees
एसटी कर्मचाऱ्यांमध्ये ‘दिवाळी भेट’ची आशा पुन्हा पल्लवीत, नवीन घडामोडी जाणून घ्या…

हेही वाचा… पुण्‍यातून फरार गुन्‍हेगारांना अमरावतीत अटक

शेतीतील कृषीपंपाचाही वापर हल्ली कमी झाला आहे. त्यामुळे राज्यात विजेची मागणी सोमवारी २३ हजार मेगावाॅटहून खाली आली. परंतु, दिवाळीच्या सुट्या संपताच पुन्हा मागणी वाढण्याचा अंदाज महावितरणच्या एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर व्यक्त केला. दरम्यान, मुंबईची मागणी २ हजार ७४६ मेगावाॅट नोंदवली गेली. सहसा ही मागणी ३ हजार ते ३ हजार २०० मेगावाॅट दरम्यान नोंदवली जाते.

वीज निर्मितीची स्थिती

राज्याला ५ हजार ८२७ मेगावाॅट वीज महानिर्मितीच्या विविध औष्णिक विद्युत प्रकल्पातून मिळत होती. तर उरन गॅस प्रकल्पातून १२२ मेगावाॅट, कोयना जलविद्युत प्रकल्पातून ३१ मेगावाॅट, सौर ऊर्जा प्रकल्पातून ७३ मेगावाॅट वीज मिळत होती. खासगी प्रकल्पांपैकी जिंदलकडून ७८२ मेगावाॅट, अदानीकडून ७४६ मेगावाॅट, आयडियलकडून १६० मेगावाॅट, रतन इंडियाकडून ७९९ मेगावाॅट, एसडब्ल्यूपीजीएलकडून ३५७ मेगावाॅट वीज उपलब्ध होत होती. तर केंद्राच्या वाट्यातूनही राज्याला ९ हजार ३१३ मेगावाॅट वीज मिळत होती.