नागपूर: नागपूरसह राज्यभरात नवरात्राच्या पूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. रोज कमी- अधिक प्रमाणात सातत्याने सोन्याचे दर वाढत होते. परंतु नवरात्राच्या पहिल्याच दिवशी नागपूरसह राज्यभरात सोन्याच्या दरात किंचित घट झालेली दिसत आहे. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोने- चांदीचे दागिने खरेदीचा बेत असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवरात्राच्या पूर्वी म्हणजे ३० सप्टेंबर २०२४ रोजी नागपुरातील सराफा बाजारात सोन्याचे दर सकाळी ११ वाजता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७५ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७० हजार ६०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५९ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४९ हजार ३०० रुपये नोंदवले गेले होते. हे दर टप्या- पट्याने वाढत २ ऑक्टोंबर २०२४ रोजी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७६ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ५९ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४९ हजार ६०० रुपयेपर्यंत पोहचले. त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंता होती.

Why Gold Price High in Marathi
Gold Price High: सोन्याच्या किंमती इतक्या का वाढल्या आहेत? असं अचानक घडलंय तरी काय?
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
states all primary schools closed on September 25
राज्यातील सर्व शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”
Sarpanch Upasarpanch Salary
Sarpanch Salary Hike : सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; राज्य सरकारचे २४ मोठे निर्णय
Govinda Hospitalized after Shooting Himself Accidently
अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच बंदुकीतून लागली गोळी, पत्नीने दिली प्रकृतीबद्दल माहिती
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण असणार? मुख्यमंत्रिपद कोणाला? शरद पवारांकडून सर्व प्रश्नांची उत्तरं

हे ही वाचा…पोहरादेवीचे ‘बंजारा विरासत ‘ संग्रहालय कसे आहे? पंतप्रधानांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण

दरम्यान नवरात्राच्या पहिल्याच दिवशी ३ ऑक्टोंबरला नागपुरात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७६ हजार १०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७० हजार ८०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५९ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४९ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे २ ऑक्टोंबरच्या तुलनेत ३ ऑक्टोंबरला नागपुरात सोन्याच्या दरात किंचित घट झाल्याचे दिसत आहे. आताही सर्वत्र सोन्याचे दर जास्त असले तरी येत्या काळात ते वाढण्याचे संकेत असल्याने आता सोन्याच्या धातूमध्ये गुंतवणूक लाभदायक असल्याचा अंदाज नागपुरातील सराफा व्यवसायिक व्यक्त करत आहे. दरम्यान नागपुरात ३ ऑक्टोंबरला प्लॅटीनमचे दर प्रति दहा ग्राम ४४ हजार रुपये नोंदवण्यात आले. हे दर मागील केंद्रीय अर्थसंकल्पात सुमारे १ हजार रुपयांनी कमी झाल्यापासून सातत्याने सारखेच आहे.

हे ही वाचा…नवरात्रच्या पहिल्याच दिवशी ‘आपली बस’ची चाके थांबल्याने नागपूरकरांचे हाल…भाजप समर्थित संघटनेनेच…,

चांदीच्या दरातही मोठी वाढ

नागपुरातील सराफा बाजारात ३० सप्टेंबरला नवरात्रोत्साच्या पूर्वी चांदीचे दर ९१ हजार ५०० रुपये प्रति किलो नोंदवण्यात आला होते. हे दर २ ऑक्टोंबरला ९३ हजार ७०० रुपये प्रति किलोपर्यंत वाढले होते. परंतु नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी ३ ऑक्टोंबरला नागपुरात चांदीचे दर प्रति किलो ९२ हजार रुपयापर्यंत खाली आहे. त्यामुळे चांदीच्या २ ऑक्टोंबरच्या तुलनेत ३ ऑक्टोंबरला तब्बल १ हजार ७०० रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे.