नागपूर : नागपूरसह देशभऱ्यात सोने- चांदीच्या दरात चढ- उताराचा क्रम कायम आहे. सोमवारी (९ डिसेंबर) नागपुरात सकाळपासून चार तासात सोन्याच्या दरात तीनदा बदल होऊन ते आणखी उंचीवर गेले. त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपुरातील सराफा बाजारात धनत्रयोदशीला (२९ ऑक्टोबर) बाजार उघडल्यावर सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार ५०० रुपये होते. लक्ष्मीपूजनाला (१ नोव्हेंबर) हे दर वाढून २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार ४०० रुपयेपर्यंत गेले होते. परंतु त्यानंतर दरात घट झाली.

हेही वाचा…“हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे, लवकरच स्फोट होणार,” ईमेलवरील धमकीने उपराजधानीत खळबळ…

नागपुरात ९ डिसेंबरला सराफा बाजार उघडल्यावर सकाळी १०.३० वाजता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७६ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार १०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५९ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४९ हजार ७०० रुपये होते. हे दर काही तासांनी दुपारी १२.५५ वाजता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७६ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५९ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४९ हजार ९०० रुपये होते. तर दुपारी १.३१ वाजता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७६ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५९ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४९ हजार ९०० रुपये दर नोंदवले गेले. त्यामुळे सराफा बाजार उघडल्यापासून सोमवारी चार तासातच सोन्याच्या दरात २४ कॅरेटमध्ये ३०० रुपये, २२ कॅरेटमध्ये ३०० रुपये, १८ कॅरेटमध्ये २०० रुपये, १४ कॅरेटमध्ये २०० रुपये प्रति दहा ग्राम वाढ झाली.

हेही वाचा…न्यायाधीशांची संपत्ती सार्वजनिक करण्याबाबत कायदा? केंद्र शासन म्हणतेय…

चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ…

नागपुरातील सराफा बाजारात धनत्रयोदशीली (२९ ऑक्टोंबर) प्रति किलो चांदीचे दर ९८ हजार ८०० रुपये होते. हे दर ९ डिसेंबरला सकाळी बाजार उघडल्यावर १०.३० वाजता ९१ हजार १०० रुपये प्रति किलो होते. हे दर दुपारी १२.५५ वाजता ९१ हजार ६०० रुपये तर दुपारी १.३१ वाजता ९२ हजार रुपये प्रति किलो नोंदवले गेले. त्यामुळे सोमवारी चार तासातच चांदीचे दर तब्बल ९०० रुपयांनी प्रति किलो वाढले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On monday december 9 price of gold rise three times in four hours from morning mnb 82 sud 02