बुलढाणा : ईद मिलादुन्नबी उत्सव समिती बुलढाणाच्या वतीने प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त रविवारी , १५ सप्टेंबर रोजी कवी इकबाल चौकातील जामा मशिदीच्या प्रांगणात रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी रक्तदात्यांचा उत्साह आणि प्रतिसाद इतका मोठ्या प्रमाणात होता की, रक्तसंकलनच्या पिशव्या संपल्या, तरी दोनशे जण रक्तदानासाठी रांगेत उभे होते! शिबिरात एकशे बावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येथील इकबाल चौकातील जामा मशिदीजवळ रक्तदान शिबिराचे आयोजन जश्न ए ईद मिलादुन्नबी समितीच्या वतीने करण्यात आले होते. या शिबिराला बुलढाण्यासह आसपासच्या गावातील तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . शिबिरात सुमारे १५२ रक्तदात्यांनी रक्तदान करून प्रेषित मोहम्मद यांना अभिवादन केले. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीचे डॉक्टर भिलवेकर, विनोद झगरे, पुजा बनकर, अभिजीत राजपूत, सागर आडबे, संघपाल वाठोरे, अनिल घोडेस्वार, सागर पाटील, खलील पठाण यांनी रक्त संकलनासाठी परिश्रम घेतले.

हे ही वाचा…बुलढाणा : तब्बल दहा तास टॉवरवर चढून आंदोलन; उडी घेण्याचा…

रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी ईद मिलादुन्नबी कमिटीचे अध्यक्ष नदीम.एस. शेख, रईसोद्दीन काझी, वसीम खान, इमाद काझी, मौलाना कलीम, शेख साजिद, शेख सलमान, सैयद अलीम, समीर पठान, सैयद तस्लीम, मोहम्मद शादाब, शेख जुबेर आदी पदाधिकारी आणि समाज बांधवांनी प्रयत्न केले. दरम्यान काँग्रेस नेत्या अॅड.जयश्री शेळके, ठाणेदार नरेंद्र ठाकरे, अड.सतीश रोठे, डॉ.अनिस खान, अड.संजय राठोड, मोहम्मद सज्जाद, मोईन काझी, नवेद काझाी, कुणाल गायकवाड, जाकिर कुरेशी, युनुस खान, मोहम्मद सुफियान , बबलु कुरेशी, सत्तार कुरेशी, कुणाल पैठणकर, जावेद खान, नवाब मिर्झा, सैयद आसिफ, गजेंद्र दांदडे, शब्बीर कुरेशी आदी विविध क्षेत्रातील नागरिकांनी शिबिराला भेटी देऊन समितीच्या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले.

हे ही वाचा…राज्यातील सर्व शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद

‘त्या’ युवकांची निराशा

जिल्हा रुग्णालयातील रक्त पेढीच्या तांत्रिक सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. संकलन चमू कडील विशिष्ट पिशव्या अपुऱ्या पडल्याने सुमारे दीडशे ते दोनशे तरुणांना रक्तदानापासून वंचित राहावे लागले.

प्रास्ताविकात ईद मिलादुन्नबी समितीचे अध्यक्ष नदीम शेख यांनी समितीच्या आजवरच्या कामगिरीचा धावता आढावा घेतला. सामितीच्यावतीने आजवरच्या कालावधीत अजान स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, अजमत-ए-मुस्तफा सम्मेलन, नातीया मुशायरा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले. भविष्यात असेच समाजाभिमुख उपक्रम राबविणार असल्याचे सांगून त्यांनी समाज बांधवांनी दिलेल्या सहकार्य बद्धल आभार मानले.

हे ही वाचा…‘हे गणराया..’ यांना सदबुद्धी दे .. ,नागपुरात या फलकाची चर्चा

सोमवारी मिरवणूक

प्रेषित मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी , १६ सप्टेंबर रोजी बुलढाणा शहरात प्रेषित मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात येणार आहे. शहरातील इंदिरा नगर, जुनागांव येथील समाज बांधव इकबाल चौकात जमा होतील. त्यानंतर इक्बाल चौकातून निघालेली मिरवणूक शहरातील विविध प्रमुख मार्गावरून निघून बुलढाणा शहराच्या जुनागाव मधील ईदगाह येथे जाईल. इदगाह वर सामूहिक नमाज अदा केल्यानंतर मिरवणुकीचा समारोप होईल, असे समितीच्या पदाधिकारी यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On september 15 eid miladunnabi utsav samiti held a blood donation camp at jama masjid scm 61 sud 02