नागपूर: रविवार आणि सोमवार विदर्भातील इतर शहरात गारपीटीसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. मंगळवारी सकाळपासून मात्र नागपूर शहरात मुसळधार पावसाने ठाण मांडले.
नागपूर व परिसरातील गावांमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरालगतच्या खापरखेडा परिसरात बोराएवढ्या गारा पडल्या. हा पाऊस आज दिवसभर कायम राहील असा अंदाज आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तर परिसरातील शेतकरी देखील चिंतातूर झाला आहे.
हेही वाचा… अवकाळी पावसाने पांढरे सोने पडले काळे!
शहरात अनेक ठिकाणी विकासकामांमुळे खोदकाम सुरू आहे. त्याची माती सर्वत्र पसरल्याने त्या त्या परिसरात चिखल झाला आहे. आधीच या कामांमुळे वाहतुकीची कोंडी होत असताना त्यात अवकाळी पावसाची भर पडली आहे.