नागपूर : पहिल्याच भेटीसाठी प्रेयसीला कॅफे हॉटेलमध्ये भेटायला बोलावल्यानंतर प्रियकराने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. प्रेयसी गर्भवती झाल्यानंतर मात्र प्रियकराने ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेत पळ काढला. या प्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. सचिन काळे (२४, कळमेश्वर) असे आरोपीचे नाव आहे.
पीडित १७ वर्षीय तरुणी बारावीची विद्यार्थिनी आहे. तिची ओळख आरोपी सचिन काळेशी एप्रिल २०२३ मध्ये झाली. दोघांनी काही दिवस भ्रमणध्वनीवर चॅटिंग केली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मे महिन्यात सचिनने प्रेयसीला पहिल्या भेटीसाठी कळमेश्वरमधील एका कॅफेमध्ये भेटायला बोलावले. दोघांनी काही वेळ गप्पा केल्या आणि त्याने हॉटेलमधील रुममध्ये नेले. तेथे तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार देऊन लग्न केल्यानंतरच प्रेमसंबंध कायम ठेवणार असल्याचे सांगितले. त्याने लगेच तिला लग्न करण्याचे आश्वासन दिले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती झाली. १५ ऑगस्टला तिच्या पोटात दुखायला लागले. तिने आईला पोटात दुखत असल्याचे सांगितले. तिला घेऊन आई नागपुरातील मोठ्या रुग्णालयात आली. डॉक्टरांनी तपासून मुलगी ३ महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. आईला धक्का बसला. तिने मुलीला विचारणा केल्यानंतर सचिन काळेचे नाव सांगितले.
हेही वाचा – पूर्व विदर्भात हिवतापाचा धोका वाढला, ऑगस्ट महिन्यात रोज सुमारे ३१ रुग्णांची नोंद
हेही वाचा – एमपीएससीची ३० सप्टेंबरपासून ३३ संवर्गासाठी मुख्य परीक्षा, निकाल डिसेंबरमध्ये
सचिनच्या घरी जाऊन विचारणा केली असता त्याने प्रेमसंबंधाबाबत नकार दिला. त्यामुळे प्रेयसीने पोलिसात तक्रार केली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गेडाम यांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. मात्र, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला उपनिरीक्षक गेडाम या पोलीस ठाण्यात ‘व्हिआयपी ट्रिटमेंट’ देत असल्याने या प्रकरणात पीडित तरुणीवर अन्याय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.