बुलढाणा : ‘होय होय वारकरी, पाहे-पाहे पंढरी’ या पंक्तीप्रमाणे जिल्ह्यातील हजारो वारकरी व भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहे. मात्र ज्यांना तिथे जाणे जमलेच नाही, ते थेट विदर्भ पंढरी अर्थात शेगावची वाट धरतात. या अलिखित परंपरेप्रमाणे आज संतनगरी विदर्भासह राज्यातून आलेल्या हजारो भाविकांनी नुसती फुलून गेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आषाढी एकादशी म्हणजे संत गजानन महाराज संस्थानसाठीही मोठा सोहळा असतो. तसेच ‘श्रीं’च्या लाखो भक्तांसाठी मोठी पर्वणी ठरते. हे भाविक गजानन महाराजातच विठुमाऊली पाहतात आणि समाधी स्थळी नतमस्तक होतात. आज सकाळपासूनच शेगावात आबालवृद्ध भाविकांची रीघ लागल्याचे दिसून आले.नजीकच्या तालुक्यातील पायदळ वाऱ्या मोठ्या संख्येने दाखल झाल्या.

हेही वाचा – परदेशात शिक्षणाच्या शिष्यवृत्ती योजनेला ५ जुलैपर्यंत मुदतवाढ; सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा…

रात्रीही दर्शनाची सुविधा

पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांच्या दीर्घ रांगा लागल्या. मुख दर्शनासाठी स्वतंत्र रांग असल्याने भाविकांची गैरसोय टळली. भाविकांची अलोट गर्दी लक्षात घेता, आज आषाढीला रात्रीही मंदिर उघडे राहणार आहे. आज सकाळी ‘श्रीं’चे विधिवत पूजन झाले. आज संध्याकाळी ‘श्रीं’च्या रजत मुखवट्यासह संस्थानची पालखी नगर परिक्रमेसाठी निघणार आहे.

हेही वाचा – भंडारा : कर्तव्यावर असलेल्या वनाधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या पाचजणांवर गुन्हे दाखल

सर्व शाखांत कार्यक्रम

शेगाव प्रमाणेच संस्थानच्या सर्व शाखांमध्येसुद्धा आषाढी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थानच्या सूत्रांनी ही माहिती दिली. श्री क्षेत्र पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, ओंकारेश्वर या शाखाही भाविकांनी गजबजलेल्या असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the occasion of ashadhi thousands of devotees enter shegaon scm 61 ssb
Show comments