नागपूर: पंढरपूरच्या आषाढी यात्रेनिमित्त २५ जून ते ५ जुलै दरम्यान राज्याच्या विविध भागातून एस.टी.महामंडळाने सोडलेल्या ५ हजार यात्रा स्पेशल बसमधून संपूर्ण राज्यातून ८ लाख ८१ हजार प्रवाशांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुर गाठले. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या २.५ लाखांनी अधिक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एस.टी.महामंडळाने यात्रेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या सहा विभागातून ५ हजार बसेच्या १७ हजार बसेस सोडल्या. त्यांच्या ५६६ फेऱ्यांमधून ०८ लाख ८१ हजार ६६५ प्रवाशांनी प्रवास केला. यातून महामंडळाला २७ कोटी ८८ लाखांचा महसूल मिळाला.

हेही वाचा >>>नागपूर: भ्रष्टाचाराचा कळस! अठरा लाख रुपये घेत परीक्षा केंद्र मालकानेच सोडवून दिले पेपर…

राज्य शासनाने दिलेल्या ज्येष्ठांना मोफत प्रवास व महिलांसाठी ५० टक्के सवलत या दोन योजनांमुळे यंदा प्रवाशी संख्या वाढली. त्यामुळे महामंडळाला मागील वर्षीच्या तुलनेत ७ कोटी ६९ लाख रुपयांचे उत्पन्न अधिक मिळाले. ही बाब एस.टी.वर प्रवाशांचा विकास दर्शवणारी आहे, असे एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the occasion of pandharpur ashadhi yatra lakhs of devotees traveled by yatra special buses from various parts of the state mnb 82 amy