नागपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात राहणार आहे. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची बारीक नजर राहणार आहे. फुटाळा चौपाटीवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते व त्यामुळे वाहतूककोंडी निर्माण होते. ही बाब लक्षात घेता २६ जानेवारीला फुटाळ्यात सर्वच प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. याबाबत वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फुटाळा तलाव चौपाटी मार्गावर दरवर्षी सकाळपासूनच तरुणाईची गर्दी होते. अनेक जण तर नियमांचे उल्लंघन करत वाहने चालवतात आणि पोलिसांनी कारवाई केली तर आक्रमक पवित्रा घेतात. सामान्य जनतेला यामुळे नाहक त्रास होतो. हीच बाब लक्षात घेऊन वाहतूक पोलीस आयुक्त शशिकांत सातव यांनी निर्देश जारी केले आहेत. फुटाळा तलावाकडून अंबाझरीकडे जाणारे वळण ते फुटाळा तलाव टी-पॉईंटपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. वाडी नाक्याकडून फुटाळा तलावामार्गे जाणारी वाहतूक जुना वाडी नाका ते रविनगर या मार्गाने वळविण्यात येणार आहे. तसेच भरतनगरकडून जाणारी वाहतूक अमरावती रोड/रवीनगर महादेव मंदिर वायुसेनानगर या मार्गे वळविण्यात येणार आहे. वायुसेना मार्ग ते फुटाळा तलाव ही वाहतूक महादेव मंदिर तेलंगखेडी मार्गे वळविण्यात येईल. २६ जानेवारी रोजी सकाळी सहा ते रात्री १० वाजेपर्यंत वाहनांना ‘नो एन्ट्री’ असेल.

हेही वाचा – यवतमाळ : शेतकऱ्यांना परदेशात ‘अभ्यास दौर्‍या’ची संधी; लाभार्थी नेमके कोण राहणार?

हेही वाचा – ‘भाजी खाया’, ‘अंडी खाया’… शालेय विद्यार्थ्यांची नवी ओळख संताप निर्माण करणारी

जागोजागी कडेकोट बंदोबस्त

नागपूर पोलिसांतर्फे शहरात सर्वच महत्त्वाचे चौक व मार्गांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आवश्यक ठिकाणी बॅरिकेड्सदेखील लावण्यात येतील. संशयास्पद हालचालींवर पोलिसांचा वॉच असणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the occasion of republic day in nagpur city heavy police presence in crowded places adk 83 ssb