वर्धा : येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आज रामलल्ला अभिषेक सोहळ्यानिमित्त विविध उपक्रमास प्रारंभ होत आहे.
हेही वाचा – फडणवीस म्हणाले, “मी आज कोणाविरुद्धही बोलणार नाही”
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. धर्वेश कथेरिया यांनी सांगितले की, अयोध्या येथील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण गालिब सभागृहात करण्यात येत आहे. शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, संशोधक यांच्यासाठी व्यवस्था झाली आहे. दुपारी अडीचपासून सांस्कृतिक महोत्सव असून त्यात सुंदर कांड पठण व संकीर्तन होईल. सायंकाळी सहा वाजता विद्यापीठ परिसरात दिव्यांचा भव्य उत्सव होणार आहे. समता भावनाच्या प्रांगणात प्रभू श्रीरामचा सेल्फी पॉईंट तयार केल्या जात आहे. सनातन परंपरा आणि मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद होणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. भीमराय मैत्री हे राहतील. त्यात देश विदेशातील कुलगुरू भाग घेणार. हिंदी विद्यापीठात आजचा दिवस सोहळा म्हणून साजरा करण्याचे आवाहन आहे.