गडचिरोली : ‘पीएलजीए’ सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील मीडदापल्लीजवळ कापडी बॅनर लावून इशारा दिल्याने दुर्गम भागात दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून नक्षल प्रभावित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पोलीस जवानांना तैनात करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्षल्यांचे सशस्त्र संघटन पीपुल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीच्या (पीएलजीए) स्थापना दिनानिमित्त नक्षलवादी दरवर्षी २ ते ८ डिसेंबरदरम्यान ‘पीएलजीए’ सप्ताह पाळतात. यादरम्यान ते हिंसक कारवाया करतात. त्यामुळे गडचिरोलीच्या नक्षलप्रभावित क्षेत्रात या काळात दहशतीचे वातावरण असते. आज ‘पीएलजीए’ सप्ताहाचा पहिलाच दिवस असून नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील मीडदापल्ली जवळ बॅनर लावले. यात त्यांनी हा सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले आहे. सोबतच यंत्रणेला इशारा देखील दिला आहे. त्यामुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा – अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमाला २० वर्षांचा कारावास

हेही वाचा – “राजकारणात सर्वच असूर नसतात तर सुरेल माणसे असतात, गडकरी आणि फडणवीस दोघेही पट्टीचे कलाकार”, मुख्यमंत्री असे का म्हणाले?

दरम्यान, सप्ताहात नक्षल्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी गडचिरोली पोलीस ड्रोनसारख्या आधुनिक उपकरणाची मदत घेत आहे. सोबतच नक्षलविरोधी पथकाचे (सी६०) अभियान अधिक गतीने राबविण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the very first day of the plga week the naxalites put up a banner near middapalli in bhamragarh taluka warning ssp 89 ssb