नागपूर : राज्यात सोने- चांदीचे दर स्थिर होत नाहीय. दिवाळीत सोने- चांदीचे दर उच्चांकीवर असल्यावरही ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात दागिने, नाण्यांसह इतर वस्तूंची खरेदी झाली. दिवाळीनंतर या धातूंचे दर स्थिर होणे अपेक्षित असतानाही सतत बदल बघायला मिळत आहे. बुधवारी (६ नोव्हेंबर) नागपुरात एका धातूच्या दरात किंचित घसरण तर एका धातूच्या दरात वाढ नोंदवली गेली. त्याबाबत जाणून घेऊ या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपुरात धनत्रयोदशीला (२९ ऑक्टोबर) बाजार उघडल्यावर सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (१ नोव्हेंबर) बाजार बंद होतांना नागपुरात सोन्याचे दर वाढून २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ८०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार ६०० रुपये होते. त्यानंतर दरात घसरण झाली.

हेही वाचा…राहुल गांधी म्हणाले संविधान नसते तर, निवडणूक आयोग नसते …

u

दरम्यान नागपुरात ५ नोव्हेंबरला बाजार उघडल्यावर नागपुरात रोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार २०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार २०० रुपये नोंदवले गेले. हे दर बुधवारी (६ नोव्हेंबर) २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार ४०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे सोन्याच्या दरात ५ नोव्हेंबरच्या तुलनेत ६ नोव्हेंबरला २०० रुपये ते ३०० रुपये प्रति दहा ग्राम वाढ झाली आहे. परंतु प्लॅटिनमचे दर प्रति दहा ग्राम ४४ हजार रुपये नोंदवले गेले.

हेही वाचा…राहूल गांधींचा आरोप… संविधानावर थेट आरोप करू शकत नसल्यामुळे संघाकडून विकास, राष्ट्रवाद शब्दांच्या आड संविधानावर हल्ला केला जातो

चांदीच्या दरात घसरण

नागपुरातील सराफा बाजारात धनत्रयोदशीच्या दिवशी २९ ऑक्टोंबरला प्रति किलो चांदीचे दर ९८ हजार ८०० रुपये होते. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (१ नोव्हेंबर) हे दर प्रति किलो ९६ हजार ५०० रुपये होते. त्यानंतर सातत्याने चांदीचे दर कमी झाले. परंतु ५ नोव्हेंबरला चांदीचे दर प्रति किलो ९४ हजार ६०० रुपये होते. या दरात ३०० रुपयांची घट होऊन हे दर ६ नोव्हेंबरला ९४ हजार ३०० रुपये नोंदवले गेले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On wednesday november 6 nagpur saw slight fall in silver prices and increase in gold prices mnb 82 sud 02