नागपूर : जलवाहिन्यांचे देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यासाठी शहरातील पाणी पुरवठा ३ ते ४ फेब्रवारीला ३० तास बंद ठेवण्यात येणार आहे. पेंच २ व पेंच ३ जलशुद्धीकरण प्रकल्प ३० तासांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश भागात ३ फेब्रुवारीला सकाळी १० ते ४ फेब्रुवारी दुपारी ४ वाजता पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेमिनरी हिल्स फीडरची अँड प्लेट बसविणे, इंटरकनेक्शन काम, लक्ष्मीनगर जुन्या फीडरवरील व्हॉल्व्ह कार्यान्वित करणे, गिट्टीखदानमधील व्हॉल्व्ह बदलणे, पेंच २ जलशुद्धीकरण येथील फिल्टर राऊस चॅनेलच्या गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गायत्रीनगर, प्रतापनगर, खामला, लक्ष्मीनगर, टाकळीसीम, जयताळा, त्रिमूर्तीनगर, रामनगर, सेमिनरी हिल्स, दाभा, टेकडी वाडी, सिव्हिल लाईन्स, फुटाळा लाईन, चिंचभवन, बोरियापुरा, खदान, सीताबर्डी किल्ला, किल्ला महाल, गिट्टीखदान येथील जलकुंभावरून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

कामगार कॉलनी, आयटी पार्क, गायत्रीनगर, विद्यानगर, गोपालनगर, प्रतापनगर, स्वावलंबीनगर, दीनदयालनगर, खामला, पावनभूमी, उज्वलनगर, जयप्रकाशनगर, पंचदीपनगर, राजीवनगर, सोमलवाडा, पांडे ले-आऊट, पन्नासे ले-आऊट, बजाजनगर, लक्ष्मीनगर, रहाटे, कॉलनी, श्रद्धानंद पेठ, आरपीटीएस कॉलनी, रमाबाई आंबेडकरनगर, जयताळा झोपडपट्टी, ठाकरे ले-आऊट, सोनगाव, एचबी स्टेच, सहकारनगर, नंदनवन, ममता सोसायटी, समर्थनगर, मनीष ले-आऊट, गुडधे ले-आऊट, गोकुळपेठ, रामनगर, मरारटोली, तेलनखेडी, टिळकरनगर, भारतनगर, हिंदुस्थान कॉलनी, वर्मा ले-आऊट, न्यू वर्मा ले-आऊट, यशवंतगर, हिल टॉप, अंबाझरी, पांढराबोडी, संजयनगर, ट्रस्ट बाबा ले-आऊट, मुंज ले-आऊट, गिरीपेठ, त्रिकोणी पार्क, रामनगर चौक, लक्ष्मी भवन चौक, गोकुळपेठ, खरे टाऊन, शंकरनगर, गांधीनगर, शिवाजीनगर, धरमपेठ, विद्यापीठ ग्रंथालय, विधी महाविद्यालय, सुरेंद्रगड, भीमटेकडी, धम्मनगर, राजीवनगर, गोंड मोहल्ला, शास्त्रीनगर, पोलीस लाईन टाकळी, फ्रेडस कॉलनी, वेलकम सोसायटी, आदिवासी कॉलनी, म्हाडा कॉलनी, दाभा, ढाबा वस्ती, सरकारी प्रेस सोसयाटी, इन्कम टॅक्स कॉलनी, टेकडी वाडी, आमदार निवास, सिव्हिल लाईन्स, रविभवन, धरमपेठ, रामदासपेठ, गिरीपेठ, काचीपुरा, गोरेपेठ, वसंतराव नाईक, आंबेडकर नगर, हायकोर्ट बंगलो, आरबीआय, रविनगर, तेलंगखेडी हनुमान मंदिर परिसर, जुना फुटाळा, विद्यापीठ परिसर, शिल्पा सोसायटी, पंचतारा सोसायटी, वैशालीनगर, संताजी सोसायटी, मनीषनगर, कृषीनारा सोसायटी, लघुवेतन सोसायटी, श्यानगरनगर, प्रभूनगर, गोळीबार चौक, हेडाऊ मोहल्ला, कुरडकर मोहल्ला, शारदा माता मंदिर, सीताबर्डी, संत्रा मार्केट, ज्योतीनगर, कॉटन मार्केट, इमामवाडा, गुजरवाडी आदी वस्त्यांना पाणी पुरवठा होणार नाही, असे, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यू कंपनीने कळवले आहे.