लोकसत्ता टीम

बुलढाणा: राजकीय पक्ष कागदोपत्री मागण्या व एकमेकावर टीका करीत असताना वन बुलढाणा मिशनचे संदीपदादा शेळके आपले सहकारी वैद्यकीय चमू व साधन सामुग्रीसह पूरग्रस्त जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात दाखल झाले. त्यांनी उपाययोजना करीत मदत करायला काल,२२ जुलैच्या रात्रीपासूनच सुरुवात केली.

Yamuna Water Controversy
Yamuna Water Controversy: यमुनेचे पाणी पेटले; ‘अस्वच्छ पाणी जाहीररित्या पिऊन दाखवा’, केजरीवालांचे अमित शाह, राहुल गांधींना आव्हान
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Review, Blue Red Flood Lines, Mula-Mutha River,
पुणे : नदीपात्राची निळी रेषा, लाल रेषा बदलणार?
Pune Municipal Corporation has decided to make it mandatory for tanker drivers to obtain license
पाणी नक्की कुठून घेतले, कुठे दिले हे सांगावे लागणार!
Hair loss and baldness cases reported in 11 Shegaon villages unsafe water found in Matargaon
टक्कलग्रस्त माटरगावमधील पाणी अपायकारक! ‘नायट्रेट’चे जास्त प्रमाण
Vasai Virar Municipal Solid Waste Management Project marathi news
‘पैसे नाहीत, असे कसे म्हणता?’, महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
guillain barre syndrome patients pune municipal corporation report survey
‘ त्या ‘ गावांना शुद्ध पाणी पुरविणे गरजेचे, काय म्हंटले नक्की महापालिकेच्या अहवालामध्ये ?
Khadakwasla, Kirkatwadi water purification, pune health department
खडकवासला, किरकिटवाडीला शुद्धीकरणाविनाच पाणी !

जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके वन बुलडाणा मिशनच्या तरुणांची फौज घेऊन पुरग्रस्त भागात पोहचले. रात्रीपासूनच वन बुलडाणा मिशनने मदतकार्याला सुरुवात केली. युवकांनी अनेक घरांतील पाणी उपसून गाळ काढला. पूरग्रस्तांच्या जेवणाची व्यवस्था तसेच आवश्यक ती मदत केल्या जात आहे. तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात आली.

आणखी वाचा-गोंदियात धावत्या कारने अचानक घेतला पेट, मग झाले काय वाचा…

अभूतपूर्व संकट

दोन्ही तालुक्यातील परिस्थिती मन हेलावून टाकणारी आहे. पुराचे पाणी नागरिकांच्या घरात घुसल्याने कपडे, अन्नधान्य, गॅस सिलिंडर वाहून गेले आहे. स्वयंपाकाचे कुठलेच साधन अनेक घरात आता शिल्लक नाही. शेती खरडून गेली आहे. यामुळे मदत कार्यासाठी इतर संघटनांनी सुद्धा पुढाकार घेण्याचे आवाहन शेळके यांनी केले.घरातील पुस्तके,कपडे वाहून गेल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने राजर्षी शाहू परिवार व मिशनने पाऊले उचलली आहेत. अशा नैसर्गिक संकटामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने वैद्यकीय शिबिर लावण्यात आले आहे.याठिकाणी तज्ञ डॉक्टरांची टीम सेवेसाठी उपलब्ध राहील.

आणखी वाचा-न्यायमूर्ती गवईंना गडचिरोलीतील रानटी हत्तींनी घातली भुरळ, म्हणाले…

सर्वे नको, मदतच द्या

अतिवृष्टीने जे नुकसान झालेय ते मन हेलावून टाकणारे, काळीज पिळवटून टाकणारे आहेत. उघड्या डोळ्यांने हे नुकसान दिसत आहे, त्यामुळे सर्वे करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तात्काळ मदत कशी पोहचवता येईल याचा विचार प्रशासकीय यंत्रणेने करावा. शासकीय पंचनामे होऊन मदत कशी मिळते याचा वाईट अनुभव लोकांना आहे, ती मदत यायला उशीर होईल, तोपर्यंत नागरिकांना वाऱ्यावर सोडता का? असा सवाल संदीप शेळके यांनी प्रशासकीय यंत्रणेला केला. पोलिस अधिक्षकांशी फोनवरून संवाद साधत त्यांनी नागरिकांच्या तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था केलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्याची मागणी केली.

Story img Loader