अकोला: गुलाबी थंडीच्या दिवस आणि दिवाळीच्या उत्सवात आकाशात देखील विविध आकर्षक घडामोडी लक्ष वेधून घेणार आहेत. उल्का वर्षावाचे निमित्ताने दिवाळी पूर्व व दिवाळी पश्चात आकाश दिवाळी, गुरु ग्रहाचे पृथ्वी सान्निध्य, ग्रह चंद्र युती, ग्रह दर्शन, बुध ग्रह उदय, आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र आदींचा मनसोक्त आनंद घेता येईल, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतांना त्यांचे पृथ्वीमधील अंतर कमी जास्त होत असते. येत्या ३ नोव्हेंबरला सूर्यमालेत सर्वात मोठा असलेला गुरु ग्रह पृथ्वीच्या जवळ येत असल्याने या कालावधीत गुरु ग्रह आकाशात आकाराने मोठा व रात्रभर दर्शन देणार आहे. या उत्साही वातावरणात सूर्य, पृथ्वी व गुरु ग्रह एका रेषेत येईल. याच वेळी आकाश मध्याशी कुंभ राशीत शनी ग्रह आणि पहाटे पुर्वेस सर्वात तेजस्वी शूक्र ग्रह, तसेच उत्तर आकाशात सप्तर्षी तारका समूहातील पहिल्या दोन ताऱ्यांचे सरळ रेषेत धृवतारा पाहता येईल.

हेही वाचा… महापालिकेतील कंत्राटी परिचारिकांची पदभरती वादात; उमेदवारांमध्ये भेद केल्याचा आरोप

५ नोव्हेंबरपासून पश्चिम आकाशात बुध ग्रहाचा उदय होत आहे. गुलाबी थंडीच्या दिवसांत दिवाळीच्या ४, ५, १३ नोव्हेंबरच्या रात्रीच्या प्रारंभी वृषभ राशी समुहातून दरताशी दहा या प्रमाणात तारे तुटतांना बघून दिवाळी पूर्व आकाश दिवाळीचा, तर १७ व १८ चे पहाटे पूर्वेस सिंह राशी समुहातून उल्कांचा आनंद घेता येईल.

८, १०, ११, १२ व १४ ला जगातील सर्वात महाग अंतराळ संशोधन व प्रशिक्षण केंद्र आकाशातून चांदणी फिरताना पाहता येईल. ९ नोव्हेंबरला पश्चिमेस शूक्र हा तेजस्वी ग्रह चंद्रासोबत युती, तर काही ठिकाणी पीधान युती करेल. १४ ला बुध ग्रह चंद्राजवळ युती स्वरूपात असेल. २० ला शनी ग्रह तर २५ ला गुरु ग्रह चंद्राजवळ बघता येईल. या घडामोडींचा आनंद घेण्याचे आवाहन प्रभाकर दोड यांनी सांगितले.