बुलढाणा: जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज मंगळवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने थैमान घातले. वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर मोठे झाड पडून घराचे नुकसान झाले. बुलढाणा, मोताळा, शेगाव आदी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. बुलढाणा तालुक्यातील शिरपूर येथील रहिवासी बापूराव हिवाळे (७०) यांच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. सोनेवाडी शिवारातील शेतात ही दुर्घटना घडली. पांगरी येथील सुभाष पवार यांच्या घरावर झाड पडल्याने घराचे नुकसान झाले. सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 24-04-2024 at 00:12 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One dead in lightning strikes amid unseasonal rainfall in buldhana district scm 61 zws