भंडारा : रात्री उशिरा दारू पिऊन घरी परत येताना दोन मित्रांमध्ये सुरू झालेला किरकोळ वाद विकोपाला गेला आणि त्यातून एकाने दुसऱ्या मित्राची चाकूने हत्या केली. एवढेच नव्हे तर हत्येनंतर त्याचा मृतदेह नाल्यात फेकून त्यावर दुचाकी ठेवली. ही घटना सोमवारच्या मध्यरात्री भंडारा शहराजवळील टाकळी येथे घडली.

आज सकाळी परिसरातील नागरिकांना नाल्यात दुचाकी दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली. कपील अशोक उजवणे (३१) असे मृताचे नाव असून ऋषभ संजय दोनोडे (२०) आणि करण दिलीप भेदे (२०) अशी हत्या करणाऱ्यांची नावे आहेत. मृत आणि आरोपी हे भगतसिंग वॉर्ड टाकळी येथील रहिवासी आहेत. भंडारा पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींना अटक केली.

What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
youth attacked police Mumbai, youth obstructed traffic ,
मुंबई : वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या तरुणाचा पोलिसावर हल्ला, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Viral video Jan Seva Kendra (mini-bank) in Uttar Pradesh's Saharanpur
Robbery in UP Bank : चोरानं समोर येऊन बंदूक रोखून धरली, तरी बँक कर्मचारी फोनवर निवांत बोलत होता! अखिलेश यादव यांची पोस्ट व्हायरल!
Kalyan Crime News in Marathi
Kalyan Crime : कल्याणमध्ये परप्रांतीयांची पुन्हा मुजोरी; चिमुरडीच्या विनयभंगाचा जाब विचारणाऱ्या मराठी कुटुंबाला मारहाण
Firing from pistols Kondhwa, pistol Kondhwa ,
कोंढव्यात दहशत माजविण्यासाठी पिस्तुलातून गोळीबार, पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा – सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे भाजपला आव्हान, संघर्ष हाणामारीपर्यंत

मृत कपील उजवणे आणि आरोपी ऋषभ व करण यांच्यात सोमवारी रात्री टाकळी येथे वाद झाला. भांडण विकोपाला गेल्याने ऋषभ आणि करण यांनी कपीलला टाकळी येथीलच निर्वाण मेटल कंपनीच्या मागील मैदानात नेले. तिथे कपीलच्या छातीवर, चेहऱ्यावर अनेकदा वार करुन ठार मारले. आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने कपीलचा मृतदेह उचलून निर्वाण मेटल कंपनीच्या मागे असलेल्या सिमेंटच्या नाल्यात फेकला. त्यानंतर कपीलच्या मृतदेहावर दुचाकी ठेवली. दरम्यान आज सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ही घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली.

हेही वाचा – मोदींनी जुमल्याचे नावच ‘मोदी की ग्यारंटी’ केले, यवतमाळात उद्धव ठाकरे बरसले

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनाम्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी आरोपी ऋषभ दोनोडे आणि करण दिलीप भेदे यांच्यावर भादंविच्या कलम ३०२, २०१ ३४ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी करीत आहेत.

Story img Loader