बुलढाणा: जिल्ह्यातील दहीहंडी उत्सवाला देऊळगाव राजा येथील दुर्घटनेने गालबोट लागलं आहे. दहीहंडीचा दोरखंड बांधलेली घराची गॅलरी दोन बालिकांवर कोसळल्याने एका बालिकेचा मृत्यू झाला तर एक बालिका गंभीर जखमी झाली.
दहीहंडी पाहत उभी असलेली चिमुकली जागीच ठार झाली. चिमुकलीचे वय केवळ ९ वर्षाचे आहे. देऊळगावराजा शहरातील मानसिंगपुरा भागात काल रात्री उशिरा ही घटना घडली. दहीहंडी साठी एका बंद अवस्थेत असलेल्या घराच्या गॅलरीला दोरी बांधण्यात आली होती. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा या दोरीला लटकला. त्यामुळे ताण पडल्याने सिमेंट पिलरसह गॅलरी खाली कोसळली. नेमके गॅलरीच्या खाली उभे राहून दहीहंडी पाहणाऱ्या निदा रशीद खान पठाण (९) हिचा जागीच मृत्यू झाला. य अल्फिया शेख हाफिज ही (८वर्षे ) गंभीर जखमी झाली आहे.तिच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा… सारस पक्ष्यांचे होणार सॅटेलाईट टॅगिंग, वनमंत्र्यांचे ट्वीट; वाचा सविस्तर…
दरम्यान, आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतक व जखमींना शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.