लोकसत्ता टीम

नागपूर: आरोग्य विभागातील सुमारे ११ हजार जागांची भरती केली जाणार आहे, यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस कंपनीची मदत घेण्यात आली आहे. यासाठी दहा ते ११ लाख अर्ज येण्याचा अंदाज प्रशासनााला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याच्या शक्यतेमुळे सर्व्हर किंवा तत्सम तांत्रिक यंत्रणा कोलमडून जाऊ नये यासाठी आरोग्य खात्याकडून पुरेशी दक्षता घेतली जात आहे. तानाजी सावंत यांनी आज दिले.

Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?
research to prevent memory issues in children with brain tumors
मेंदूत गाठ असलेल्या लहान मुलांमधील स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी संशोधन; गेल्या दोन वर्षांत टाटा रुग्णालयाचे संशोधन पूर्ण

आरोग्य विभागाच्या भरतीप्रक्रियेबाबत या खात्याचे मंत्री डॉ. सावंत यांनी रविवारी मुंबईत बैठक घेतली. भरतीप्रक्रिया सर्वात मोठी आहे. यापूर्वीच्या परीक्षांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गैरप्रकार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे तशा प्रकारचा कुठलाही गैरप्रकार आरोग्य विभागाच्या परीक्षेत व्हायला नको. परीक्षेसाठी १०ते ११ लाख अर्ज येण्याची शक्यता लक्षात घेता सर्व्हरची क्षमता वाढवावी, इतर तांत्रिक बाजू मजबूत कराव्या ज्यामुळे परीक्षार्थ्यांना अडचणी येणार नाही. याचे नियोजन करा, अशा सूचना डॉ. सावंत यांनी दिल्या.

आणखी वाचा-अकोला महापालिकेचा निगरगट्टपणा; अखेर गणेशभक्तांनीच रस्त्यावरील खड्डे बुजवले

भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी ‘हेल्प डेस्क’ तयार करावा. भरतीचे तारीखनिहाय वेळापत्रक देण्यात यावे, परीक्षा केंद्रांची आत्तापासूनच निश्चित करावी, उमेदवारांना परीक्षा केद्रांवर येताना असलेले नियम प्रवेशपत्रावर नमूद करावे. असे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी दिले. बैठकीला विभागाचे व कंपनीचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.