बुलढाणा : बहुचर्चित बारावी गणित पेपर फूटप्रकरणी साखरखेर्डा (ता. सिंदखेडराजा) पोलिसांनी गुरुवारी आणखी एका युवकाला अटक केली. यामुळे आता आरोपीची संख्या आठ झाली आहे. दानिश खान फिरोज खान (२१, रा. शेंदुर्जन, ता. सिंदखेडराजा) यास पोलिसांनी गुरुवारी अटक केली. अटक करण्यात आलेल्यांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी चार शिक्षकांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. लोणार येथील झाकिर हुसेन उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अब्दुल अकील अब्दुल मुनाफ, लोणार येथीलच सेंट्रल पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजचे शिक्षक अकुंश पृथ्वीराज चव्हाण, किनगाव जट्टू येथील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक गजानन शेषराव आडे आणि शेंदुर्जन येथील संस्कार ज्युनियर कॉलेजचे गोपाल दामोदर शिंगणे, अशी निलंबित शिक्षकांची नावे आहेत.