भंडारा : संगम येथील कन्हान नदीपात्रात मासे पकडण्याकरिता संगम पुनर्वसन येथील दोन मित्रांनी सकाळी जाळे टाकून ठेवले. सायंकाळी नावेमधून जाळ ओढत असताना अचानक एकाचा तोल जाऊन नदीपात्रात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा जीव वाचला.

धनपाल किरण आपतुरकर वय ४० रा. संगम पुनर्वसन असे मृतकाचे नाव आहे, तर लक्ष्मण तांनबा शिंदे ३१ वर्षे रा. संगम पुनर्वसन असे बचावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

हेही वाचा – पूर्व विदर्भात हिवतापाचे सात बळी, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा

हेही वाचा – यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती बँकेत अविश्वासापूर्वीच अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांचा राजीनामा, नवीन फॉर्म्युला कसा राहणार?

लक्ष्मण आणि धनपाल दोघेही नेहमीप्रमाणे संगम पुनर्वसन येथून नदीपात्रात मासे पकडण्यासाठी गेलेले असता ३१ जुलै रोजी ही घटना घडली. धनपाल यांचा मृत्यूदेह अजूनही हाती लागलेला नसून शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. घटनेची माहिती जवाहरनगर पोलिसांना देण्यात आली असून घटनास्थळी ठाणेदार सुधाकर बोरकुटे यांनी आपल्या ताफ्यासह दाखल होऊन, शोधमोहीम राबवली, मात्र धनपालचा मृतदेह पोलिसांना गवसला नाही. शेवटी भंडारा येथून रेस्क्यू टिमला पाचारण करण्यात आले आहे. शोधमोहीम युद्धपातळीवर अद्यापही सुरू आहे.

Story img Loader