लोकसत्ता टीम
बुलढाणा : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मध्यप्रदेश सीमेला लागून असलेल्या भागातून १७ जिवंत काडतुससह एक पिस्तुल जप्त करण्यात आले आहे
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर जळगाव तालुक्यात चेक पोस्ट तयार करण्यात आली आहे. दरम्यान, जामोद येथून एका जणाकडून एक पिस्तूल, १७ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. जळगाव जामोद येथे खरेदी – विक्रीच्या उद्देशाने एक जण पिस्तूल बाळगून असल्याची माहिती शाखेला मिळाली. त्यावरून पथकाने शेख जमीन शेख चांद याला ताब्यात घेतले. तो जळगाव तालुक्यातील खेड शिवार येथील रहिवासी आहे. त्याच्या जवळून पिस्तूल, १७ जिवंत काडतूस, मॅगझीन आणि एक मोबाईल फोन मिळाला.
आणखी वाचा-श्रीरामाच्या रामटेकात मोदी कोणाला लक्ष्य करणार?
आरोपी शेख जमीन शेख चांद याला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक सुनिल कडासने पोलीस अधीक्षक बुलडाणा, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आशिष चेचरे, श्रीकांत जिदमवार, दिपक लेकुरवाळे, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, युवराज राठोड, गजानन गोरले, आशा मोरे यांनी ही कामगिरी केली.