अकोला : गणरायाचे वाजत-गाजत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात मंगळवारी आगमन झाले. गणेशोत्सव मंडळांसह भाविकांनी जल्लोषात आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत केले. ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषात गुलाल उधळीत ढोल-ताशाच्या निनादात विघ्नहर्ता बाप्पाचे आगमन झाले. जिल्ह्यात सुमारे १७३२ गणपतींची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये ३०२ ठिकाणी ‘एक गाव एक’ गणपतीचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – शिक्षण मंचाच्या अधिवेशनासाठी वसुली! अभ्यास मंडळ अध्यक्षाला पाच हजार तर सदस्याला तीन हजार रुपये मागितले

हेही वाचा – अकोला : कारमध्ये कोंबून गायींची तस्करी; नाकाबंदीदरम्यान उघडकीस आला धक्कादायक प्रकार

मांगल्य, पावित्र्य आणि उत्साहाचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला आनंदात सुरुवात झाली. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी विविध सामाजिक देखावे साकारण्यात आले. बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात झाल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले. पर्यावरणपूरक मातीची मूर्ती घेण्याकडे घरगुती गणेशभक्तांचा कल दिसून आला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ढोल-ताशा, दिंडीच्या निनादात वाजत गाजत मिरवणूक काढून गणरायाची स्थापना केली. यावर्षी गणेश मंडळात वाढ झाली असून, ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात ‘श्रीं’ची स्थापना करण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One village one ganesha at 302 places in akola district establishment of ganpati in 1732 mandals ppd 88 ssb
Show comments