लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : रेल्वेला उशीर झाल्यामुळे सामान्य माणसाची कामे लांबल्याची बाब भारतीय लोकांसाठी काही नवी नाही. मात्र रेल्वेला उशीर झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुरू असलेल्या सुनावणीला काही काळासाठी थांबवावे लागले. शुक्रवारी सकाळी १०:३० वाजता नायलॉन मांजा प्रकरणावर दाखल जनहित याचिकेवर सुनावणी होती. नायलॉनची ऑनलाईन विक्री फेसबुकवर होत असल्याने न्यायालयाने फेसबुकला उपाययोजनांबाबत विचारणा केली होती. यामुळे फेसबुकच्या वतीने सुनावणीत सहभागी होण्यासाठी त्यांचे वकील नवी दिल्ली येथून नागपूरकडे रवाना झाले. वेळेवर विमानाचे तिकीट न मिळाल्याने वकिलांनी रेल्वेने नागपूर गाठायचे ठरविले.

Vishal Gawli in custody at Naupada police station thane news
विशाल गवळी नौपाडा पोलीस ठाण्यातील कोठडीत, रेल्वे मार्गे गाठले होते बुलढाणा
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
average speed of freight trains over previous 11 years barely 25 kilometers per hour
अवघा २५ किलोमीटर सरासरी वेग… मालगाड्यांचा वेग कमी झाल्याने मालवाहतुकीवर परिणाम होत आहे का?
thane station disabled coaches
ठाणे : अपंगांच्या डब्यात धडधाकड प्रवाशांची घुसखोरी, तीन वर्षांत नऊ हजारहून अधिकजणांवर कारवाई
Technical work Sindhi railway station, trains cancelled,
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे! ‘या’ ९ रेल्वे रद्द…
woman risked her life to make a reel on train track shocking video goes viral
तरुणी रेल्वे रुळावर रील बनवण्यात मग्न, ट्रेन आल्याचंही भान राहिलं नाही अन्…; VIDEO चा शेवट पाहून तुम्हालाही येईल संताप
number of disabled coaches in Central Railways suburban journeys has increased in recent years
रेल्वेतील अपंगांच्या डब्यात घुसखोरी, तीन वर्षांत ९ हजार जणांवर कारवाई

सुनावणीत सहभागी होण्यासाठी नवी दिल्ली येथून रेल्वेने निघालेले वकील न्यायालयाने निर्धारित केलेल्या वेळेवर पोहोचू शकले नाही. न्यायालयाची कारवाई सुरू झाल्यावर दृकश्राव्य माध्यमातून, नागपूरमध्ये पोहोचायला आम्हाला १५ मिनिटे वेळ लागेल त्यामुळे काही काळ कारवाई थांबविण्यात यावी अशी विनंती केली. एक तास वाट बघितल्यावर न्यायालयाने प्रकरणावर पुन्हा सुनावणी सुरू केली. मात्र रेल्वे नागपूरच्या बाहेरच्या भागात अडकल्याने तेव्हाही वकील न्यायालय गाठू शकले नाही. यावर न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला.

आणखी वाचा-राजमाता जिजाऊंच्या टपाल तिकीटाचे अनावरण

‘आमच्या धैर्याची परीक्षा घेऊ नका’

फेसबुकच्या मार्केट प्लेसवर होणाऱ्या नॉयलॉनची विक्री थांबविण्याकरिता काय उपाययोजना करणार आहात याबाबत शुक्रवारपर्यंत माहिती देण्याचे आदेश न्यायालयाने फेसबुकला दिले होते. एक तास उलटल्यावरही वकील प्रत्यक्षात न्यायालयात हजर न राहिल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. आमच्या धैर्याची परीक्षा घेऊ नका, न्यायालय तुमच्या वेळेनुसार कार्य करणार आहे का, असे म्हणत न्यायालयाने संताप व्यक्त केला. पुढील सुनावणी बुधवारऐवजी सोमवारी ठेवण्यात यावी अशी विनंती फेसबुकच्या वकिलांनी केल्यावर पुन्हा त्यांना फटकारण्यात आले.

Story img Loader