वर्धा : जिल्ह्याचे कांद्याचे कोठार समजल्या जाणाऱ्या आष्टी तालुक्यात मुसळधार झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आष्टी तालुक्यात लहान आर्वी, जैतापूर, पिल्लापुर, जोट्वाडी, देलवडी, बेलोरा, अंतोरा, किन्हाला, वाघोली, खडकी, शिरसोली, अहमदपूर, परसोडा व अन्य गावात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. अनेकांच्या शेतात कांदा काढून ठेवला आहे. तर कांद्याचे वाफे पाण्याने तुडुंब भरल्याने कांद्याची पाल सडू लागली आहे.

हेही वाचा – वर्धा : पावसाचा कहर; ७५ जनावरे दगावली, फळबागा उद्ध्वस्त

तसेच तोडून ठेवलेला कांदा पाण्यात भिजलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीपण पसरत असल्याचे भाजपा तालुका पदाधिकारी सुनील साबळे यांनी सांगितले. चिरतांना तर कधी भाव पडल्याने अश्रू काढणारा कांदा आता पाणीमय झाला. हा फटका सहन करणे शक्य नसल्याने शासनाने तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.