महेश बोकडे

नागपूर : परिवहन खात्याने ‘आरटीओ’तील भ्रष्टाचार संपवण्यासाठी घरबसल्या ऑनलाईन परीक्षेतून वाहन परवाने देणे सुरू केले. त्यानंतर गैरप्रकार थांबवण्यासाठी कॅमेऱ्याच्या नजरेत पथदर्शी प्रकल्प मुंबई पूर्व आरटीओत ऑगस्ट २०२२ मध्ये सुरू झाला. हा प्रकल्प राज्यभरात राबवला जाणार असला तरी तांत्रिक अडचणींमुळे आतापर्यंत लांबला आहे. परंतु, आता महिन्याभराच्या आत हा प्रकल्प राज्यात  सुरू करण्याच्या हालचाली आहेत.

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Shocking viral video of ac local train crowd in Mumbai air conditioned local trains are disappointing shocking video goes viral
एसी ट्रेनचं तिकीट काढताय? मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरचा ‘हा’ VIDEO पाहून धडकी भरेल; पाहा नेमकं काय घडलं?
Young Girl Performs Lavani Dance
गौतमी पाटील तरुणीसमोर फेल! सादर केली सुरेख लावणी, VIDEO होतोय व्हायरल
TET, AI, TET malpractices, TET news, TET latest news,
‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला
MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान
Video of young girl doing stunt with little kid went viral on social media
VIDEO: उंचावरून उडी मारली अन्…, चिमुकल्याला घेऊन तरुणीने रस्त्यावर केला जीवघेणा स्टंट, पाहा नेमकं काय घडलं?

परिवहन खात्याने ‘आरटीओ’तील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी १४ जून २०२१ पासून घरबसल्या ऑनलाईन परीक्षेतून शिकाऊ वाहन परवाने देणे सुरू केले. त्यासाठी परिवहन खात्याने राष्ट्रीय माहिती केंद्राकडून (एनआयसी) वाहन व सारथी-४ या संगणकीय प्रणालीत बदल करून घेतले. परंतु राज्यातील काही दलालांनी व्यवस्थेतील दोषांचा फायदा घेत बरेच गैरप्रकार केले. नागपुरातील लोकसत्ता कार्यालयात केलेल्या एका स्टिंग ऑपरेशनमध्ये एका अंधालाही हा परवाना मिळाला होता. या प्रकरणाची त्यावेळचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दखल घेतली.

परिवहन खात्याने मुंबई पूर्व ‘आरटीओ’त घरबसल्या कॅमेऱ्याच्या नजरेत परीक्षेचा पथदर्शी प्रकल्प सुरू केला. तो लवकरच राज्यभरात राबवला जाणार होता. परंतु, याप्रसंगी बऱ्याच तांत्रिक अडचणींमुळे त्याची अद्यापही राज्यात अंमलबजावणी झाली नाही. दरम्यान, परिवहन खात्याने ‘एनआयसी’शी चर्चा सुरू करत तांत्रिक दोष दूर करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच नागरिकांना भ्रष्टाचारमुक्त वातावरणात घरबसल्या पारदर्शी पद्धतीने वाहन चालवण्याचे शिकाऊ परवाने कॅमेराच्या नजरेतील परीक्षेतून मिळण्याचे संकेत मिळत आहे. त्यासाठी नवीन परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी पुढाकार घेतला आहे.

‘वेब कॅम’ची गरज ..

 राज्यभरात कॅमेऱ्याच्या नजरेत ऑनलाईन पद्धतीने वाहन परवान्याची सोय झाल्यास उमेदवारांना घरबसल्या ऑनलाईन परीक्षा देताना स्वत:च्या संगणकावरील ‘वेब कॅम’ सुरू करावा लागेल. तो सुरू असतानाच ही परीक्षा होईल. परीक्षेदरम्यान उमेदवार कॅमेऱ्याच्या फ्रेममधून बाहेर गेला वा परीक्षेदरम्यान आक्षेपार्ह हालचाली करताना दिसल्यास ‘सॉफ्टवेअर’ संबंधिताला परीक्षेतून बादच करेल.

मुंबई पूर्व ‘आरटीओ’ कार्यालयात सुरू असलेल्या पथदर्शी प्रकल्पात काही तांत्रिक दोष निदर्शनास आले. ते दूर करण्याचे प्रयत्न सुरू असून सुमारे महिन्याभराच्या आत घरबसल्या ऑनलाईन परीक्षा कॅमेरेच्या नजरेत राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

– विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त, मुंबई