महेश बोकडे
नागपूर : परिवहन खात्याने ‘आरटीओ’तील भ्रष्टाचार संपवण्यासाठी घरबसल्या ऑनलाईन परीक्षेतून वाहन परवाने देणे सुरू केले. त्यानंतर गैरप्रकार थांबवण्यासाठी कॅमेऱ्याच्या नजरेत पथदर्शी प्रकल्प मुंबई पूर्व आरटीओत ऑगस्ट २०२२ मध्ये सुरू झाला. हा प्रकल्प राज्यभरात राबवला जाणार असला तरी तांत्रिक अडचणींमुळे आतापर्यंत लांबला आहे. परंतु, आता महिन्याभराच्या आत हा प्रकल्प राज्यात सुरू करण्याच्या हालचाली आहेत.
परिवहन खात्याने ‘आरटीओ’तील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी १४ जून २०२१ पासून घरबसल्या ऑनलाईन परीक्षेतून शिकाऊ वाहन परवाने देणे सुरू केले. त्यासाठी परिवहन खात्याने राष्ट्रीय माहिती केंद्राकडून (एनआयसी) वाहन व सारथी-४ या संगणकीय प्रणालीत बदल करून घेतले. परंतु राज्यातील काही दलालांनी व्यवस्थेतील दोषांचा फायदा घेत बरेच गैरप्रकार केले. नागपुरातील लोकसत्ता कार्यालयात केलेल्या एका स्टिंग ऑपरेशनमध्ये एका अंधालाही हा परवाना मिळाला होता. या प्रकरणाची त्यावेळचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दखल घेतली.
परिवहन खात्याने मुंबई पूर्व ‘आरटीओ’त घरबसल्या कॅमेऱ्याच्या नजरेत परीक्षेचा पथदर्शी प्रकल्प सुरू केला. तो लवकरच राज्यभरात राबवला जाणार होता. परंतु, याप्रसंगी बऱ्याच तांत्रिक अडचणींमुळे त्याची अद्यापही राज्यात अंमलबजावणी झाली नाही. दरम्यान, परिवहन खात्याने ‘एनआयसी’शी चर्चा सुरू करत तांत्रिक दोष दूर करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच नागरिकांना भ्रष्टाचारमुक्त वातावरणात घरबसल्या पारदर्शी पद्धतीने वाहन चालवण्याचे शिकाऊ परवाने कॅमेराच्या नजरेतील परीक्षेतून मिळण्याचे संकेत मिळत आहे. त्यासाठी नवीन परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी पुढाकार घेतला आहे.
‘वेब कॅम’ची गरज ..
राज्यभरात कॅमेऱ्याच्या नजरेत ऑनलाईन पद्धतीने वाहन परवान्याची सोय झाल्यास उमेदवारांना घरबसल्या ऑनलाईन परीक्षा देताना स्वत:च्या संगणकावरील ‘वेब कॅम’ सुरू करावा लागेल. तो सुरू असतानाच ही परीक्षा होईल. परीक्षेदरम्यान उमेदवार कॅमेऱ्याच्या फ्रेममधून बाहेर गेला वा परीक्षेदरम्यान आक्षेपार्ह हालचाली करताना दिसल्यास ‘सॉफ्टवेअर’ संबंधिताला परीक्षेतून बादच करेल.
मुंबई पूर्व ‘आरटीओ’ कार्यालयात सुरू असलेल्या पथदर्शी प्रकल्पात काही तांत्रिक दोष निदर्शनास आले. ते दूर करण्याचे प्रयत्न सुरू असून सुमारे महिन्याभराच्या आत घरबसल्या ऑनलाईन परीक्षा कॅमेरेच्या नजरेत राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
– विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त, मुंबई