वाशीम : सध्या मोबाइलवर कुठलीही माहिती बघायला गेले की, जंगली रमी पे आओ ना महाराजची जाहिरात कलाकार करताना दिसून येतात. यामधे नवं तरुण बळी पडत असल्याने सरकारने तत्काळ ऑनलाईन जंगली रमीवर प्रतिबंध घालवा, अशी मागणी रिसोड येथील नगर सेविका मीराताई चऱ्हाटे यांनी मुख्यमत्र्यांकडे केली आहे.
आजची तरुण पिढी अभिनय क्षेत्रातील अभिनेत्यांना हिरो म्हणून त्यांच्याकडे आकर्षित होतात. याचाच फायदा घेऊन काही कलाकार ऑनलाइन जुगाराचे आमिष दाखवून युवकांना ऑनलाईन जुगाराकडे आकर्षित करतात. यामधे अनेक युवक बळी पडत असून ऑनलाईन जुगारच्या आहारी जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री यांना केलेल्या तक्रारीत नगरसेविका मीराताई चऱ्हाटे यांनी केला असून सरकारने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा >>>तेलांगणात कर्जमाफी.. ‘बीआरएस’चा नागपुरात जल्लोश.. पण फटाक्यांवर पाणी..
सध्या प्रत्येकाकडे स्मार्ट फोन असून अनेक युवक तासनतास मोबाइलवर जुगार खेळतात. शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातील अनेक तरुण, युवक ऑनलाईन जंगली रमीच्या आहारी गेल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, हा सर्व प्रकार ऑनलाईन असल्याने त्यावर अंकुश ठेवणार तरी कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.