नागपूर : उन्हाळा ऋतू म्हणजे लग्नसराईचे दिवस. विवाह इच्छुक तरुणाईच्या लग्नगाठी याच ऋतूत सर्वाधिक बांधल्या जातात. करोनाच्या प्रादुर्भावामुळे लागलेल्या टाळेबंदीने तरुणाईच्या स्वप्नावर पाणी फे रले गेले. मात्र, त्यातही अनेकांनी शक्कल लढवली आणि टाळेबंदीतही स्वप्नाची पूर्तता के ली. असाच एक ऑनलाईन विवाह सोहोळा सध्या उपराजधानीत चर्चेचा ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोनू आवळे व शलाका बहादुरे यांच्या विवाहाचा मुहूर्त २९ एप्रिलचा होता. मोठय़ा थाटामाटात हा सोहोळा पार पडणार होता. तशी तयारीही झाली होती. पण करोनाचा विळखा घट्ट होत गेला आणि टाळेबंदीचा तिसरा टप्पा जाहीर करावा लागला. त्यामुळे हा सोहोळा समोर ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, काही दिवसांपूर्वी सोनू आवळे यांच्या वडिलांची प्रकृ ती बिघडली. त्यांना अर्धागवायू झाला आणि काहीही होण्यापूर्वी सून घरात यायला हवी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त के ली. टाळेबंदीचे नियम कडक असताना काय करायचे, असा प्रश्न मुलासमोर निर्माण झाला. पोलिसांनी विवाहाची परवानगी दिली, पण स्थानिक बुद्ध विहार समितीने त्यांना विवाहासाठी जागा देण्यास नकार दिला. अखेर शलाका बहादुरे या वधूच्या घरीच विवाह करण्याचे ठरले.

धरमपेठेतील तिच्या घरी अवघ्या पाच जणांच्या उपस्थितीत हा विवाह सोहोळा पार पडला. सोहोळ्याला सोनू आवळे याची आई आणि मित्र के वळ उपस्थित होते. यावेळी भन्ते यांनी विवाहाची सर्व प्रक्रि या ऑनलाईन  पार पडली. त्यामुळे नागरिकांसाठी हा विवाह सोहोळा चर्चेचा विषय ठरला.