लोकसत्ता टीम

नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीत मतदान वाढले आहे. परंतु तृतीयपंथींकडून यंदा विदर्भातील ६२ मतदारसंघात केवळ २९.५८ टक्केच मतदान झाले. सर्वात कमी मतदान गोंदिया व नागपूर जिल्ह्यात झाले.

देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!
Sharad Pawar asserts that distrust in the electoral system should be removed print politics news
मारकडवाडीवरून कलगीतुरा, निवडणूक यंत्रणेबद्दल अविश्वास दूर करा; शरद पवारांचे मारकरवाडीत प्रतिपादन

तृतीयपंथींनी यंदा मतदानाकडे पाठ दाखवल्याचे चित्र आहे. विदर्भाच्या अकरा जिल्ह्यातील ६२ विधानसभा मतदारसंघात तृतीयपंथी मतदारांची संख्या ६४९ इतकी आहे. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक तृतीयपंथी नोंदवण्यात आले आहेत.

आणखी वाचा-विधानसभा निवडणुकीत मुनगंटीवार विजयी होणार? निकालापूर्वीच चंद्रपुरात…

दरम्यान विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सात मतदारसंघातील ३८ जण, अकोलातील पाच मतदारसंघातील ५, वाशीमच्या तीन मतदारसंघातील ३, अमरावतीच्या आठ मतदारसंघातील ९७, यवतमाळच्या सात मतदारसंघातील ६१, वर्धेतील चार मतदारसंघातील ४, नागपूर जिल्ह्यातील बारा मतदारसंघातील ३०२, भंडारातील तीन मतदारसंघातील ४, गोंदियातील चार मतदारसंघातील १०, गडचिरोलीतील तीन मतदारसंघातील १०, चंद्रपुरातील सहा मतदारसंघातील ४९ मतदारांचा समावेश आहे. त्यापैकी बुलढाण्यातील सर्व मतदारसंघात १६ तृतीयपंथींनी मतदान केले. अकोल्यात १६, वाशीमला १३, अमरावतीत ३०, यवतमाळला ३०, वर्धेत १०, नागपुरात ५०, भंडारा ४, गोंदिया १, गडचिरोली ५, चंद्रपुरात १७ तृतीयपंथींनी मतदान केले. त्यामुळे विदर्भातील ६४९ तृतीयपंथी मतदारांच्या तुलनेत केवळ १९२ मतदारांनीच मतदानाचा हक्क बचावल्याने केवळ २९.५८ टक्केच मतदान नोंदवले गेले आहे.

आणखी वाचा-थेट अमित शहांकडून पुर्नवसनाचा शब्द मिळूनही माजी आमदाराचा सन्यास…म्हणाले, काय भरवसा?…

विदर्भातील तृतीयपंथींचे जिल्हानिहाय मतदान

जिल्हा मतदानाचे प्रमाण
बुलढाणा४२.११ टक्के
अकोला ३४.०४ टक्के
वाशीम ६८.४२ टक्के
अमरावती ३०.९३ टक्के
यवतमाळ ४९.१८ टक्के
वर्धा ७६.९२ टक्के
नागपूर १६.५६ टक्के
भंडारा ६९.६१ टक्के
गोंदिया १०.०० टक्के
गडचिरोली ५०.०० टक्के
चंद्रपूर ३५.४२ टक्के
एकूण २९.५८ टक्के

तृतीयपंथींचे म्हणने काय?

निवडणुकीपूर्वी ऑगस्ट महिन्यात तृतीयपंथी संतापले होते. आम्हाला सिग्नलवर, रस्त्यांवर फिरून पैसे मागू दिले जात नाही. आमच्यावर पोलिसांकडून कारवाई होते. राज्य शासनाकडून हल्ली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तरुणांसाठी लाडका भाऊ योजना काढली गेली. या योजनेबाबत आम्हाला काही म्हणायचे नाही, मात्र लाडका तृतीयपंथी योजना कोणी काढायला तयार नाही?, प्रत्यक्षात आम्हाला कुणी नोकरी देत नाही. समाजाकडून दुर्लक्षित केले जाते. त्यामुळे तृतीयपंथींनी जगायचे कसे? हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लाडकी तृतीयपंथी योजनाही आणून या दुर्लक्षित घटकाला न्याय देण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे या घटकाकडे कायमच दुर्लक्ष केल्याने त्याचा फटका बसला व त्यांनी कमी मतदान केले, असे बोलले जात आहे.

Story img Loader