बुलढाणा : India Lok Sabha Election 2024 Phase 2 Voting Updates बुलढाणा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज, शुक्रवारी( दि २६) मतदानास संथगतीने प्रारंभ झाला. आज सकाळी ७ ते ९ दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात जेमतेम ६.६१ टक्के मतदानाची नोंद झाली. एकूण सहापैकी चिखली विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ९.७० तर जळगाव जामोद मतदारसंघात सर्वात कमी३.१९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
एकूण १७ लाख ८२हजार ७०० मतदारांसाठी १९६२ मतदान केंद्र आहेत. आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार दोन तासाच्या पहिल्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी ६.६१ इतकी आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत १, १९ ००० जणांनी मतदान केले.
हेही वाचा >>> यवतमाळ-वाशिममध्ये सकाळी नऊपर्यंत केवळ ७.२३ मतदान, समर्थकांमध्ये धाकधूक
विधानसभा निहाय मतदान पुढीलप्रमाणे आहे.बुलढाणा ४.४२टक्के, चिखली ९.७० मेहकर ९.०७,सिंदखेडराजा ७.४०,खामगाव ५.७९ जळगाव जामोद ३.१९ टक्के. दरम्यान, आज लग्नतिथी(लग्न मुहूर्त)आहे. मात्र सोनाळा (ता. संग्रामपूर) येथील नवरदेवाने या धामधुमीत पाहिले मतदान केले. यानंतर तो लग्न मंडपात पोहोचला.