नागपूर : मराठा आणि कुणबी समाजासाठी असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) परदेशी शिष्यवृत्तीसाठी केवळ ८२ अर्ज प्राप्त झाले आहेत. सारथीतर्फे ७५ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवले जाणार आहे. दुसरीकडे ओबीसी प्रवर्गातील २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले. मात्र, त्यांच्यापैकी केवळ ५० विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.

सारथीने मराठा व कुणबी या जातीमधील विद्यार्थ्यांना स्पर्धापूर्व प्रशिक्षण तसेच परदेशी शिष्यवृत्तीच्या योजना सुरू केल्या आहेत. या सारथी संस्थेकडून ७५ विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती देण्यास राज्यमंत्रिमंडळाने अलीकडेच मान्यता दिली आहे. ओबीसी प्रवर्गाची लोकसंख्या अधिक असल्याने विद्यार्थ्यांची संख्याही जास्त आहे. या समाजातील किमान १५० विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवण्याची व्यवस्था सरकारने करावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. सध्या इतर मागास बहुजन कल्याण खात्यामार्फत ५० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जात आहे. यावर्षी ओबीसींचे २०० हून अधिक अर्ज आले.

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
education board warning against schools for obstructing students while filling exam application zws
परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा
Cow milk subsidy of Rs 57 crores to farmers in Satara news
साताऱ्यातील शेतकऱ्यांना ५७ कोटींचे गायीच्या दुधाचे अनुदान
more than 1700 retirees people in nashik benefit from DLC scheme of Postal Department
सेवानिवृत्तवेतन धारकांच्या मदतीला टपाल विभाग, जिल्ह्यात १७०० पेक्षा अधिक जणांना डीएलसी योजनेचा लाभ
Rohingya house in Pune
Rohingya in Pune: रोहिंग्याने बांधले थेट पुण्यात स्वतःचे घर, भारतीय पासपोर्टही मिळवले
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
sex ratio of birth in nashik municipal corporation
जिल्ह्यात लिंगोत्तर प्रमाणात घट; लिंग चाचणीची दक्षता समिती बैठकीत साशंकता

हेही वाचा – शिक्षक भरती : अर्ज भरताना ‘ही’ काळजी घ्या, अन्यथा…

हेही वाचा – नागपूरची नागनदी प्रदूषितच, निवडणुकांच्या तोंडावर आणखी एक समिती

दरम्यान, सारथीने परदेशी शिष्यवृत्तीसाठी आपल्या संकेतस्थळांवरून अर्ज मागवले आहेत. या योजनेत विद्यार्थ्यांना ५० लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेचा लाभ मराठा आणि कुणबी या दोन्ही जातीतील विद्यार्थ्यांना घेता येते. परंतु शिष्यवृत्तीसाठी केवळ ८२ अर्ज प्राप्त झाले आहेत. हे अर्ज पुणे आणि जवळपासच्या विद्यार्थ्यांचे आहेत. सारथीच्या योजनांचा कुणबी जातीच्या विद्यार्थ्यांना लाभ घेता येणे शक्य आहे. या जातीचे बहुतांश विद्यार्थी विदर्भ व कोकण या विभागात आहेत. परंतु, या भागातील विद्यार्थी सारथीच्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना दिसत नाहीत. त्यामुळे सारथीकडे कुणबी विद्यार्थ्यांचे अर्ज अगदी नगण्य आहेत. अर्ज करण्याची तारीख वाढवण्यात यावी आणि कुणबी अधिक असलेल्या भागात योजनांचा प्रचार करण्यात यावा, अशी मागणी महाज्योतीचे माजी संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी केली आहे.
…………………………………..

Story img Loader