लोकसत्ता टीम
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
नागपूर: रामटेक लोकसभा मतदारसंघात ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसचे बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर केला होता.
येथील वंचितचे अधिकृत उमेदवार व भाजपचे बंडखोर शंकर चहांदे यांनी कौटुंबिक कारणावरून आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते. मात्र पहिल्या फेरीमध्येत किशोर गजभिये यांना केवळ ९४२ मते मिळाली. त्यामुळे वंचितसाठी हा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे, गजभिये यांनी २०१९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर रामटेक लोकसभेतून निवडणूक लढवली होती.
First published on: 04-06-2024 at 11:17 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only 942 votes for kishore gajbhiye in the first round dag 87 mrj