वर्धा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरावर आलाय. कर्नाटकात मते मिळवू शकतील किंवा प्रभाव पाडू शकतील अशी दोनच नावे केंद्रीय नेत्यांनी पक्की केली आहेत. गडकरी व फडणवीस यांच्या शिवाय महाराष्ट्रात दुसरा नेता नाही का, असा प्रश्न चर्चेत आला आहे.
हेही वाचा – अकोला: माजी सैनिकाच्या गोळीबारात एकाचा मृत्यू; जमिनीच्या वादातून घडले हत्याकांड
या दोन नेत्यांशिवय बावनकुळे, पंकजा मुंढे, विनोद तावडे, आशिष शेलार असे अन्य नेते आहेत. त्यांना संधी का नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत प्रत्यक्ष बोलण्यास कोणी तयार नाही. मात्र, जिल्हा सूत्रधार अविनाश देव म्हणाले की, उल्लेख झालेल्या नेत्यांना अन्य जबाबदारी देण्यात आली आहे. जे निवडणूक जिंकून देवू शकतात अशांचा विचार झाला असावा, हे माझे वैयक्तिक मत आहे, असे देव म्हणाले.