छत्तीसगडच्या रायपूरला काँग्रेसचे ८५वे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. २४, २५ व २६ फेब्रुवारीस होत असणाऱ्या या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी एक सूचनापत्रच काढण्यात आले आहे. या अधिवनेशनात ठराविक पदाधिकाऱ्यांनाच प्रवेश असून इतरांना मज्जाव करण्यात आला आहे.
या ठिकाणी फक्त निमंत्रित प्रदेश प्रतिनिधी, स्वीकृत प्रदेश प्रतिनिधी व जिल्हाध्यक्ष यांनाच प्रवेश मिळणार आहे. इतरांना मज्जाव असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निमंत्रितांना २४ला सायंकाळी रायपूरला पोहचायचे आहे. तेथे प्रदेश काँग्रेसच्या व्यवस्थापन समितीशी संपर्क केल्यानंतर निवास व अन्य व्यवस्था उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने नाना गावंडे यांना व्यवस्थापन समिती प्रमुख म्हणून नेमले आहे. तर समितीत संजय राठोड, उत्कर्षा रुपवते, राजेंद्र शेलार, श्रावण रापणवाड व जफर खान हे अन्य सदस्य आहेत.