नागपूर : १९ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली असून अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी नागपूर लोकसभा मतदारसंघात एक अर्ज दाखल झाला. रामटेकसाठी इच्छुकांनी अर्ज खरेदी केले, मात्र कोणीही दाखल केले नाहीत. देशातील महत्त्वाच्या मतदारसंघापैकी एक असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी ४५ इच्छुकांनी एकूण ८२ अर्ज खरेदी केले. यापैकी एक अर्ज दाखल करण्यात आला. अर्ज दाखल करणाऱ्याचे नाव व्यंकटेश्वर महास्वामी आहे.

हेही वाचा >>> जागा नक्की, पण उमेदवार गुलदस्त्यात! महाविकास आघाडीसह लाखो मतदारातील संभ्रम कायम

question arises if the second term of election wasted former corporators and aspirants
दुसरी टर्मही वाया जाणार ? निवडणुकांवरची सुनावणी लांबल्याने अनेकांच्या पोटात गोळा
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Image Of Ajit Pawar
Ajit Pawar : “मी काही साधू संत नाही”, बीडमधून अजित पवार यांचा कोणाला इशारा?
youths Ambernath questions republic day hoardings future corporators
प्रजासत्ताकदिनी तरूणांनी वेधले लक्ष ; प्रजासत्ताक दिनाचे बॅनर का नाहीत, भावी नगरसेवकांना सवाल
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका
What is an executive order issued by the President of the United States
अमेरिकेचे अध्यक्ष जारी करतात ती ‘एक्झेक्युटिव्ह’ ऑर्डर म्हणजे काय? तो अमेरिकेचा कायदा ठरतो का?
Sunil Tatkare On Raigad Guardian Minister
Sunil Tatkare : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित केल्यानंतर सुनील तटकरेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्री आल्यानंतर…”
scam is alleged in recruitment of clerks and constables at District Central Cooperative Bank with management accused of hiding information
उत्तीर्ण उमेदवारांचे गुण जाहीर न केल्याने संशयाचे धुके; चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरती प्रकरण

रामटेक मतदारसंघासाठी २५ इच्छुकांनी ३१ अर्ज खरेदी केले, यापैकी एकही दाखल झाला नाही. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २८ मार्च आहे. आतापर्यंत प्रमुख राजकीय पक्षापैकी फक्त भाजपचे नितीन गडकरी यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेससह अन्य पक्षांकडून त्यांच्या उमेदवाराची घोषणा झाली नाही. अर्ज दाखल करताना उमेदवारासोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी उमेदवारांना तीनपेक्षा अधिक वाहने आणण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात पाच पेक्षा अधिक लोकांना जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

Story img Loader